Friday, May 3, 2024
HomeनाशिकTrimbakeshwar : दुगारवाडी धबधब्यावर पर्यटकांची गर्दी; त्र्यंबक पोलिसांकडून पाहणी

Trimbakeshwar : दुगारवाडी धबधब्यावर पर्यटकांची गर्दी; त्र्यंबक पोलिसांकडून पाहणी

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar

येथील दुगारवाडी धबधब्यावर (Dugarwadi Waterfall) आज शनिवार (दि.१५) रोजी पर्यटकांनी (Tourists) मोठी गर्दी केली होती. त्यामुळे त्र्यंबकेश्वर पोलिसांनी (Trimbakeshwar Police) दुगारवाडी धबधब्याची पाहणी केली…

- Advertisement -

Rain Update : राज्यात पुढील काही तासांत मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ ठिकाणी यलो, ऑरेंज अलर्ट

दुगारवाडी धबधबा म्हणजे ‘दुगारा नदीत डोंगरावरून पडणारे पाणी होय. येथील धबधब्याच्या खाली जायचे असल्यास नदीत (River) उतरून जावे लागते. तर वरील काठावरून दुगारा धबधबा व्यवस्थित दिसतो. अशातच आज सकाळी काही पर्यटक याठिकाणी गेले असता पाणी वाढलेले होते. त्यामुळे ते पर्यटक काही काळासाठी तेथे थांबले. त्यावेळी दोन पर्यटक अडकल्याची स्थिती होती. मात्र, पावसाचा (Rain) जोर कमी असल्याने ते सुखरूप वरती आले.

Shasan Aaplya Dari : “जे घरी बसतात त्यांना जनता…”; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

दरम्यान, यावेळी पर्यटक अडकल्याची माहिती त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालय आणि पोलिसांपर्यंत पोहचली असता त्र्यंबक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे, गोपनीयचे सचिन गवळी, कॉ. श्रावण साळवे यांनी धबधब्याच्या ठिकाणी भेट देऊन पर्यटकांना योग्य त्या सूचना दिल्या. तर उद्या रविवार असल्याने याठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याठिकाणी आता वनविभागाचे (Forest Department) लक्ष असणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Shasan Aaplya Dari : नाशिकमध्ये शासन ‘रामदरबारी’ : देवेंद्र फडणवीस

- Advertisment -

ताज्या बातम्या