Tuesday, May 7, 2024
Homeनगरअंगणवाडी सेविका मदतनीसांच्या आंदोलनाने जिल्हा परिषद दणाणले

अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या आंदोलनाने जिल्हा परिषद दणाणले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांची सोडवणूक होण्यासाठी जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनच्यावतीने मंगळवारी (दि.25) जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या अंगणवाडी सेविकांच्या घोषणांनी जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून निघाला.

- Advertisement -

या आंदोलनात संघटनेच्या अध्यक्षा कॉ. मदिना शेख, सरचिटणीस कॉ. राजेंद्र बावके, कॉ. जीवन सुरुडे, शोभा लांडगे, मंदा कसारा, माया जाजू, नंदा पाचपुते, अलका नगरे, संगीता विश्वास, रजनी क्षीरसागर, संगीता इंगळे, मन्नाबी शेख, अरुणा खळेकर, अलका दरंदले, सुजाता शिंदे, मंगल राऊत, प्रतिभा निकाळे, निर्मला चांदेकर, शशिकला औटी, शोभा विसपुते, सुनीता धसाळ, मंदा निकम, शकीला पठाण, सविता दरंदले, सुनिता बोरुडे, सरला राहणे, शोभा खंडागळे, नंदा राजगुरू, कुसुम भापकर, मंगल राऊत, अरुणा डांगे आदी सहभागी झाले होते. राज्य अंगणवाडी कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सदरचे आंदोलन करण्यात आले.

यावेळी प्रमुख वक्त्यांनी शासनाच्या वेळकाढूपणाचा निषेध नोंदवला. अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत संबंधित खात्याचे मंत्री, सचिव, महिला व बालकल्याण विभाग यांच्यासमवेत कृती समितीची चर्चा झालेली होती. यावेळी मंत्री महोदयांनी प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही त्याची पूर्तता झालेली नाही. अंगणवाडी कर्मचार्‍यांचे दरमहा पेन्शन, ग्रॅच्युईटी, शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा, सेवानिवृत्तीनंतरचे थकीत एक रक्कम लाभ तातडीने देणे यांसह प्रकल्पाशी संबंधित विविध प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सदरचे आंदोलन करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

दरमहा अर्ध्या मानधनाएवढी पेन्शन देण्याचा प्रस्ताव शासनाला विनाविलंब सादर करून तो मंजूर करण्यात यावा. महिला व बाल विकास मंत्री यांनी 2023 च्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील अंगणवाडी कर्मचार्‍यांना ग्रॅच्युईटी देण्याचे सांगितले होते, त्यानुसार ग्रॅच्युईटी मिळावी. बहुसंख्य अंगणवाडी कर्मचार्‍यांना अजूनही सेवानिवृत्तीचे लाभ मिळालेले नाही, असे सांगण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद महिला बाल कल्याणचे जिल्हा प्रकल्प अधिकारी मनोज ससे यांना देण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या