Thursday, May 16, 2024
Homeमुख्य बातम्या“तुम्ही १० वर्ष कृषिमंत्री होते...”, मुख्यमंत्री शिंदेंचा पवारांना खोचक टोला

“तुम्ही १० वर्ष कृषिमंत्री होते…”, मुख्यमंत्री शिंदेंचा पवारांना खोचक टोला

मुंबई | Mumbai

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केल्यानंतर कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत म्हटलं की, केंद्र सरकारने पहिल्यांदा हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना मदतीसाठी कांदा खरेदीचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यामध्ये केवळ राजकारण न करता शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. शरद पवार मोठे नेते आहेत. पवार साहेबही १० वर्ष कृषिमंत्री होते. तेव्हा शेतकऱ्यांबाबत अशी परिस्थिती उद्भवली होती, तेव्हा असा निर्णय कधी घेतला गेला नाही. काही सूचना असतील तर त्यांनी सरकारला कराव्यात. असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. विरोधकांना केलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या