Friday, May 3, 2024
Homeनाशिकधनगर समाजासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाची घरे बांधण्याची योजना

धनगर समाजासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाची घरे बांधण्याची योजना

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या व्यक्तींसाठी वैयक्तिक घरकुल बांधणे योजना इतर मागास वर्ग बहुजन कल्याण विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षात या योजनेच्या लाभासाठी इच्छुकांनी संबंधित गावाच्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधून अर्ज सादर करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नाशिक देविदास नांदगावकर यांनी केले आहे…

- Advertisement -

इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा 6 सप्टेंबर 2019 रोजीचा शासन निर्णय या योजनेसाठी निर्गमित झाला आहे. भटक्या जमाती प्रवर्गातील धनगर समाजातील लोकांचा सर्वांगिण विकास व्हावा व त्यांना स्थिरता यावी यासाठी भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधून देणे हे योजनेचे उद्दिष्ट आहे.

लीबियामध्ये महापूर! सहा हजारांहून अधिक जणांचा मृत्यू, अनेक शहरं उद्ध्वस्त, 30 हजारांहून अधिक बेपत्ता

या योजनेच्या लाभासाठी लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. लाभार्थी कुटुंब हे भज-क या मूळ प्रवर्गातील तसेच गावोगावी भटकंती करून उपजिविका करणारे असावे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार पेक्षा कमी असावे. कुटुंबाचे स्वत:च्या मालकीचे घर नसावे. लाभार्थी बेघर अथवा झोपडी / कच्चे घर/ पालामध्ये राहणारे असावा.

शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर सुनावणी; पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर

पुनर्वसित /प्रकल्पग्रस्त गावठाणातील लाभार्थी कुटुंबाना सामूहिक वसाहत योजनेमध्ये घरकुलाचा लाभ देण्यासाठी भूमीहीन असल्याची अट शिथिल करण्यात येत आहे. मात्र इतर सामूहिक योजनेमध्ये लाभार्थी यांच्यासाठी भूमीहीनची अट कायम राहणार आहे. लाभार्थी कुटुंब हे भूमीहीन असावे (प्रकल्पग्रस्त/ पुनर्वसित सोडून) परंतु घरे बांधण्यासाठी स्वत:ची जागा असावी.

लाभार्थी कुटुंबाने राज्यात कोठेही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. या योजनेचा लाभ कुटुंबातील एकाच व्यक्तीस देण्यात येतो. लाभार्थी हा वर्षभरात ६ महिने एका ठिकाणी वास्तव्यास असणे गरजेचे आहे. असेही सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नाशिक देविदास नांदगावकर यांनी कळविले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर सुनावणी; ठाकरे-शिंदे गटाचे आमदार विधानभवनात दाखल

- Advertisment -

ताज्या बातम्या