Saturday, May 18, 2024
Homeजळगाववैद्यकीय अधिकाऱ्यांना डेंगू : उपचारासाठी मुंबईला धाव

वैद्यकीय अधिकाऱ्यांना डेंगू : उपचारासाठी मुंबईला धाव

 वरणगाव ग्रामीण रुग्णालय वाऱ्यावर : डेंग्यूचा प्रसार , पालिकेचा निष्काळजीपणा

प्रतिनिधी वरणगाव

शहरांमध्ये डेंग्यू आजाराच्या रुग्णांची संख्या वाढली असून वरणगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना डेंग्यू झाल्याने ते मुंबई येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे यामुळे ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्याने वाऱ्यावरती असून वरिष्ठांचे दुर्लक्ष झाले आहे

- Advertisement -

शहरात गेल्या काही दिवसांपासून डेंगू आजाराने डोके वर काढले आहे यामुळे काही रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत वरणगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त असल्याने एकमेव वैद्यकीय अधिकारी क्षितिजा हेडवे काम सांभाळत आहेत,

परंतु त्यांनाच डेंग्यू आजार झाल्याने त्या मुंबईतील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहे यामुळे ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसून येथील पदभार मुक्ताईनगर येथील वैद्यकीय अधिकारी नम्रता अच्छा यांच्याकडे सोपविण्यात आला आहे .

ते पूर्णवेळ याठिकाणी हजर नसल्याने सकाळची बाह्यरुग्ण तपासणी शालेय आरोग्य तपासणी वैद्यकीय अधिकाऱ्यांन कडून  करून घेतली जाते मात्र त्यानंतर याठिकाणी डॉक्टर नसल्याने इमर्जन्सी रुग्णांवर ती उपचार होत नाही पर्याय खाजगी रुग्णालयांमध्ये धाव घ्यावी लागते या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी नसल्याचे अनेक दिवसांपासून ओरड असून याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाही लोकांच्या आरोग्याचा हा गंभीर प्रश्न असल्याने आता तरी लक्ष द्यावे अशा प्रकारची मागणी नागरिकांमधून होत आहे

मुख्याधिकारी हे बाहेरगावहून  ये जा करत असल्याने शहरातील समस्यांबाबत त्यांना पुरेशी कल्पना नाही डेंग्यू आजारासाठी धुरळणी करण्यात आली मात्र त्याचा काही उपयोग झाला नसून ठोस उपाय योजना होणे गरजेचे आहे अन्यथा डेंगू आजाराचे रुग्ण वाढतील

याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक नागेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मोबाईल उचलला नाही

- Advertisment -

ताज्या बातम्या