Monday, May 6, 2024
Homeनगरनगर जिल्ह्यात 37 लाख टन उसाचे गाळप

नगर जिल्ह्यात 37 लाख टन उसाचे गाळप

नेवासा (तालुका प्रतिनिधी)– नगर जिल्ह्यातील 10 सहकारी व 4 खाजगी अशा एकूण 14 साखर कारखान्यांनी 02 फेब्रुवारी 2020 अखेर 37 लाख 10 हजार 670 मेट्रीक टन उसाचे गाळप करून 36 लाख 17 हजार 795 क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा 9.75 टक्के आहे.

नगर जिल्ह्यातील या वर्षीचे गळीत हंगाम 22 नोव्हेंबरपासून सुरू झालेले आहेत. मागील वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे उसाची टंचाई आणि ऊस तोडणी मजुरांची कमतरता यामुळे कमी ऊस पुरवठा होत असल्याने सर्वच साखर कारखान्यांचे दैनिक गाळप क्षमतेपेक्षा कमी गाळप होत आहे. ऊस पुरवठ्याअभावी काही कारखान्यांना तर दिवसातील 12-12 तास गाळप बंद ठेवावे लागत आहे.एक किंवा दोन पाळ्यांत कमी क्षमतेने गाळप करावे लागत असल्याने कारखान्यांचे तोटेही वाढत आहेत.अशा परिस्थितीत किमान नोंदीचा ऊस क्रमप्राप्त आल्याने कारखान्याचे हंगामही बंद करता येत नाहीत अशी वेळ आलेली आहे.

- Advertisement -

राज्यात 336 लाख टन ऊसाचे गाळप… राज्यातील 143 साखर कारखान्यांनी 02 फेब्रुवारी 2020 अखेर 336.88 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 359.92 लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. 02 फेब्रुवारी पर्यंत राज्यातील 77 सहकारी व 66 खाजगी अशा एकूण 143 साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले होते.

2 फेब्रुवारी अखेर जिल्ह्यातील कारखान्यांचे गाळप

कारखाना ऊस गाळप साखर उतारा मे.टन क्विंटल टक्के

ज्ञानेश्वर 4,09,720 4,05,850 9.91
मुळा 2,27,910 2,18,300 9.58
संजीवनी 2,66,783 2,38,100 8.93
कोपरगाव 2,51,783 2,58,000 10.25
अशोक 2,05,370 1,93,500 9.42
प्रवरा 2,71,100 2,84,100 10.48
संगमनेर 4,58,600 4,63,540 10.33
अंबालिका 729860 6,95,450 9.53
गंगामाई 4,60,950 4,32,560 9.18
वृद्धेश्वर 1,00,670 83,200 8.26
अगस्ती 2,32,334 2,46,680 10.62
केदारेश्वर 1790 हंगाम बंद —
क्रांती शुगर 74,910 76,425 10.19
युटेक शुगर 28,830 22,100 7.67

एकूण 37,10,670 36,17,795 9.75

- Advertisment -

ताज्या बातम्या