Monday, June 24, 2024
HomeनाशिकNashik Loksabha 2024 : शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष निवडणूक लढवणार; माघार नाहीच

Nashik Loksabha 2024 : शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष निवडणूक लढवणार; माघार नाहीच

नाशिक | Nashik

- Advertisement -

नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी (Nashik and Dindori Loksabha) आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी नेत्यांचा चांगलाच जोर लागताना पाहायला मिळत आहे. यात दिंडोरी लोकसभेतून माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण (Harichnadra Chavan) आणि माजी आमदार जे पी गावित या दोन दिग्गज नेत्यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता या मतदारसंघात खरी लढत मविआचे भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) आणि महायुतीच्या डॉ. भारती पवार (Dr.Bharati Pawar) यांच्यात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे देखील वाचा : नाशिक रोड भागातील बारदान गोदामाला भिषण आग

दुसरीकडे नाशिक लोकसभेत (Nashik Loksabha) अर्ज माघारीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांची मनधरणी केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिक लोकसभेतून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांनी माघार घेत महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंना (Hemant Godse) पाठींबा दिला आहे. त्यानंतर सर्वांच्या नजरा नाशिक लोकसभेतून अपक्ष निवडणूक लढवत असणारे शांतिगिरी महाराज हे उमेदवारी अर्ज माघार घेणार का? याकडे लागल्या होत्या. पंरतु, शांतिगिरी महाराज (Shantigiri Maharaj) हे उमेदवारी अर्ज माघार न घेता नाशिकमधून (Nashik) अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले आहेत. त्यामुळे महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराची अडचण वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

हे देखील वाचा : Dindori Loksabha 2024 : माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाणांची दिंडोरी लोकसभेतून माघार

यावेळी बोलतांना शांतीगिरी महाराज म्हणाले की, ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. त्यामुळे आम्ही ठाम निर्धार केला आहे की, नाशिक लोकसभेची निवडणूक लढायची आणि जिंकायची. यामुळे नाशिक लोकसभेतून माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जनतेने आम्हाला उभे केले असून जनतेनेच ही निवडणूक लढायची आणि जिंकायची असा
निर्धार केला असल्याचे त्यांनी म्हटले.

दरम्यान, नाशिक लोकसभेचे चित्र माघारीनंतर स्पष्ट होणार असले तरी सध्याच्या परिस्थितीत महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) महायुतीचे हेमंत गोडसे आणि वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर (Karan Gaikar) हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याशिवाय शांतीगिरी महाराजांसह अन्य काही अपक्षही निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांच्या दृष्टीने नाशिकची निवडणूक महत्वाची असणार आहे.

हे देखील वाचा : Dindori Loksabha 2024 : दिंडोरी लोकसभेतून माकपचे जे पी गावित घेणार माघार

- Advertisment -

ताज्या बातम्या