Saturday, May 4, 2024
HomeUncategorizedकसला आलाय्, ‘सोशल डिस्टन्स ?’

कसला आलाय्, ‘सोशल डिस्टन्स ?’

जनधनचे पैसे काढण्यासाठी बँकांसमोर लागल्या रांगा, सुरक्षितेचे तीनतेरा

धुळे  –

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपायात व्यक्ती-व्यक्तींमधील सामाजिक अंतर अर्थात सोशल डिस्टन्सींग हाच प्रभावी उपाय आहे. याबाबत सक्त सूचना असतांना देखील धुळ्यात याचे उघड उल्लंघन होत असल्याचे दिसते आहे. जनधन खात्यातील पैसे काढण्यासाठी बँकांसमोर सकाळपासूनच रांगा लागत असल्याचे दिसत असून यामुळे सुरक्षिततेचे पुर्णत: तीनतेरा वाजले आहे.

- Advertisement -

वास्तविक जनधन योजनेंतर्गत या खात्यातील पैसे काढण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी स्वतंत्रपणे वेळापत्रक जाहीर केले आहे. बँक खातेक्रमांकाच्या शेवटच्या आकड्यानुसार वार ठरवून देण्यात आले आहे. तरी सुध्दा खातेदारांनी बँकेसमोर भल्यामोठ्या रांगा लावल्याचे आढळून येते आहे.

कोरोनासी सामना करायचा असेल तर परपस्परांच्या संपर्कात न येणे हाच यावरील प्रभावी उपाय आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवांसाठी देखील प्रत्येकी साडेतीन फूटाचे अर्थात एक मिटरचे अंतर राखण्यात येत असून तशा खूणा जमिनीवर करण्यात आल्या आहेत.

बँकांनी मात्र हा नियम पाळला नसल्याचे दिसून येते. या उलट पैसे काढण्यासाठी नागरिकांनीच एवढी गर्दी केली आहे की, त्यांना या नियमाचे किंवा सार्वजनिक आरोग्य सुरक्षिततेचे भानच उरलेले नाही.

असे असले तरी सुरक्षा यंत्रणेने गरज वाटल्यास सक्तीचा वापर करुन नागरिकांमधील सामाजिक अंतर राखण्याबाबतची खबरदारी घेणे गरजेचे आहे.

धुळे जिल्ह्यात अजून कोरोना बाधित एकही रुग्ण आढळून आला नसला तरी कोरोना विरुध्दची लढाई मात्र संपलेली नाही. सर्वदूर शर्थीचे प्रयत्न होत असतांना मात्र धुळ्यात होणारे हे उल्लंघन आणि नागरिकांच्या बेशिस्तपणाबद्दल नाराजी व्यक्त होते आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या