Monday, June 24, 2024
Homeनाशिकनाशिक महापालिकेच्या हद्दीत ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप

नाशिक महापालिकेच्या हद्दीत ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप

मुंबई | Mumbai

- Advertisement -

शिवसेनेत (Shivsena) पडलेल्या फुटीनंतर ठाकरे आणि शिंदे (Thackeray and Shinde Group) या दोन्ही गटांकडून सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांतील काही प्रमुख नेत्यांकडून एकमेकांवर कधी विविध घोटाळ्यांच्या तर कधी नेत्यांवर केलेल्या व्यक्तिगत टीकेच्या माध्यमातून आरोप करण्यात येत आहेत. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारने नाशिक महापालिकेच्या हद्दीत ८०० कोटी रुपयांचा भूसंपादन घोटाळा (Land Acquisition Scam) केल्याचा आरोप केला आहे.

संजय राऊत यांनी एक्स (ट्वीटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) काळात भ्रष्ट्राचार हाच शिष्टाचार ठरत आहे. सध्याचे महाराष्ट्रातील (Maharashtra) मिंधे सरकार हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. नाशिक महापालिकेच्या (Nashik NMC) हद्दीत ८०० कोटीचा भुसंपादन घोटाळा नगरविकास खात्याने (Urban Development Department) केला आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक गैरव्यवहारातले थेट लाभार्थी आहेत. येत्या दोन दिवसांत मी यावर स्फोट करीन. तोपर्यंत लाभार्थ्यांनी शांत झोपावे. महाराष्ट्र कोण लुटत आहे? असे संजय राऊत पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

हे देखील वाचा : मोठी बातमी! केंद्र सरकारकडून कांद्यावरील निर्यात बंदी मागे

दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तसेच संजय राऊत यांचा या आरोपांच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर रोख असल्याचे बोलले जात आहे. कारण राज्याचे नगरविकास खातं हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे या प्रकरणात नाशिकमधील आणखी कुणाची नावे राऊत घेतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

हे देखील वाचा : Loksabha Election 2024 : उत्तर महाराष्ट्रातील ‘या’ मतदारसंघातील वंचितच्या उमेदवाराचा अर्ज बाद

- Advertisment -

ताज्या बातम्या