Saturday, May 4, 2024
Homeनगरकोपरगाव : पोहेगांव परिसर संपूर्ण लॉकडाऊन

कोपरगाव : पोहेगांव परिसर संपूर्ण लॉकडाऊन

शिवालगत कोरोना पेशंट सापडल्याने खबरदारी

सोनेवाडी (वार्ताहर)- सिन्नर तालुक्यातील पाथरे खुर्द येथील एक पेंशट कोरोना बाधीत सापडल्याने खबरदारी म्हणून कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील संपूर्ण परिसर लाँकडाऊन करण्यात आला आहे.
तीन दिवसांपूर्वी पोहेगाव शिवालागत पाथरे येथील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव आढळून आला. पोहेगाव शिव ते पाथरे चे अंतर अगदी दोन ते चार किलोमीटर संबंधित व्यक्ती व त्याचा नातेवाईक शिंदे वस्ती व पोहेगाव परिसरात कामानिमित्त येत असल्याची चर्चा देखील आहे. संशयित व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
त्यामुळे पोहेगाव परिसरात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 14 एप्रिल पर्यंत कोपरगावच्या धर्तीवर संपूर्ण गाव अत्यावश्यक सेवेसह बंद ठेवण्यात आले होते. मात्र परवा दिवशी पाथरे येथे कोरोना पॉझिटिव पेशंट सापडल्याने आणखी खबरदारी म्हणून पोहेगाव मधील सर्वच व्यवहार 16 एप्रिल पर्यंत बंद करण्यात आले. किराणा दुकान, पिठाची गिरणी, मेडिकल दवाखाने सह सर्व अत्यावश्यक सेवाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.
- Advertisment -

ताज्या बातम्या