Friday, May 3, 2024
Homeनाशिकनाशिक जिल्ह्यात आणखी दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले; रुग्णसंख्या ४८ वर

नाशिक जिल्ह्यात आणखी दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले; रुग्णसंख्या ४८ वर

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज साठी ओलांडलेल्या एक महिला आणि एका पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचे सिद्ध झाले. आज दुपारी मिळालेल्या अहवालात हे सिद्ध झाले आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ४८ वर पोहोचली आहे.

- Advertisement -

आज आढळलेल्या रुग्णांमधील एक रुग्ण मालेगाव येथील असून दुसरा नाशिक शहरातील आहे.   नाशिक शहर सातपूर-अंबड लिंक रोडवरील 63 वर्षांची वृद्ध महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. तर मालेगाव येथील 64 वर्षांच्या पुरुषाला कोरोनाची बाधा झाली असून या बाधितास एंजिओप्लास्टीसाठी नाशिकमधील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संतापजनक : मालेगावी कोरोनाबाधित थुंकला रुग्णवाहिका चालकावर; वाईटसाईट शिवीगाळही केली

आज दुपारी तीन वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील कोरोना पाॉझिटिव्हची संख्या ४८ वर पोहोचली आहे. यामध्ये मालेगावातील ४०, नाशिक शहरातील पाच, जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील तीन रुग्णांचा समावेश आहे.

काल नाशिक शहरात एका २४ वर्षीय तरूण पुरूषाला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले असतानाच मालेगाव मध्येही चार नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असताना आज पुन्हा दोन रुग्ण आढळून आल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या