Friday, May 3, 2024
Homeनगर157 सामुदायिक आरोग्य अधिकार्‍यांना झेडपीकडून नेमणुका

157 सामुदायिक आरोग्य अधिकार्‍यांना झेडपीकडून नेमणुका

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांचे आदेश

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विज्ञान विद्यापीठाची परीक्षा उत्तीर्ण आणि जिल्हा सरकारी रुग्णालयास अन्य मेडिकल कॉलेजमध्ये सहा महिन्यांचे वैद्यकीय प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 157 सामुदायिक आरोग्य अधिकारी यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एस.पाटील यांनी नेमणुकांचे आदेश दिले आहेत. यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य उपकेंद्रावर असणार्‍या रिक्त जागांवर आता डॉक्टर उपलब्ध होणार आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी पारनेर तालुक्यात नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाची परीक्षा उत्तीर्ण आणि जिल्हा सरकारी रुग्णालयास अन्य मेडिकल कॉलेजमध्ये सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या डॉक्टरांची नियुक्ती करून त्याव्दारे आरोग्य उपकेंद्रात ग्रामीण जनतेला आरोग्याच्या सेवा देण्यात येत होत्या.

त्याच धर्तीवर 157 डॉक्टरांनी सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले असून या सर्वांना नेमणुका देण्यात आल्या आहे. जिल्ह्यात रिक्त असणार्‍या 492 डॉक्टरांच्या जागांपैकी 157 डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. उर्वरित ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर गुणवत्तेनुसार डॉक्टरांना नेमणुका देण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या