Friday, May 3, 2024
Homeनाशिकजिल्हा बँक कर्मचार्‍यांकडून करोनाग्रस्तांसाठी ७८ हजारांची मदत

जिल्हा बँक कर्मचार्‍यांकडून करोनाग्रस्तांसाठी ७८ हजारांची मदत

सिन्नर : करोनाच्या पार्श्‍वभूमीवर गरजु कुटूंबांना मदतीचा हातभार लावण्यासाठी  तालुक्यातील जिल्हा बँकेच्या सेवकांनी ७८हजारांची मदत  शिवसरस्वती फाऊंडेशन च्या संस्थापक अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्या सिमंतीनी कोकाटे यांच्या कडे सुपूर्द केली.

करोना महामारीमुळे गेल्या महिनाभरापासून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले असून सर्व उद्योगधंदे बंद आहे. परिणामी हातावर पोट असणार्‍या रोजंदारी करुन उदरनिर्वाह करणारे मजुर, शेतमजुर, छोटे व्यावसायिक, विडी कामगार, कंत्राटी कामगार आदी घटकाच्या कुटूंबांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.

- Advertisement -

आर्थिक दुर्बल घटकांच्या मदतीला सर्वच स्थरातील सामाजिक संस्था  पुढे सरसावल्या असून शिवसरस्वती फाऊंडेशनच्यावतीने आ. माणिकराव कोकाटे, जि.प.सदस्या सिमंतिनी कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली मदत कार्य जोमात सुरु आहे.

शिवसरस्वतीच्या कार्याला हातभार लागावा आणि गरजुंपर्यंत मदत पोहचावी या उद्देशाने जिल्हा बँकेत कार्यरत असलेल्या  तालुक्यातील ८१ सेवकापैकी ७८ सेवकाकडुन प्रत्येकी रोख एक हजार असे ७८ हजार रुपये जमा करून  सदरची रक्कम कोरोनाग्रस्तांना मदत म्हणून शिवरस्वती फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा कोकाटे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

यावेळी बँकेचे विकास अधिकारी  नितीन ओस्तवाल, निरिक्षक तथा बँकेचे माजी सेवक संचालक कैलास निरगुडे, शहा शाखेचे संदिप लोखंडे,  सोमठाणे शाखेच्या खुशबू कोकाटे उपस्थित होत्या. जिल्हा बँँकेतील सेवकांचे पगार वेळेवर होत नसुन सुध्दा सेवकांनी केलेल्या मदतीबद्दल सिमंतिनी कोकाटे यांनी सेवकांचे आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या