Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशलॉकडाऊनमुळे 67 टक्के मजुर बेरोजगार

लॉकडाऊनमुळे 67 टक्के मजुर बेरोजगार

सार्वमत

नवी दिल्ली – देशात करोना संकटामुळे असलेल्या लॉकडाऊनमुळे आतापर्यंत 67 टक्के मजुरांना रोजगाराला मुकावे लागले आहे.

- Advertisement -

दहा सामाजिक संघटनांसह अझीम प्रेमजी विद्यापीठाने देशातील 12 राज्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. सर्वेक्षणासाठी 4 हजार मजुरांशी फोनवर संपर्क साधण्यात आला.

आंध्र प्रदेश, बिहार, दिल्ली, गुजरात, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र (पुणे), ओडिसा, राजस्थान, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल या राज्यांत सर्वेक्षण करण्यात आले.

लॉकडाऊनमुळे शहरी भागातील 10 पैकी 8 तर ग्रामीण भागात 10 पैका 6 मजूरांनी आपला रोजगार गमावला आहे तर तसेच
51 टक्के मजुरांच्या पगारामध्ये घट झाली किंवा त्यांना पगारही मिळाला नाही.  49 टक्के कुटुंबांकडे आठवडाभर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याइतके पैसे नसल्याचेही सर्वेक्षण अहवलात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या