Friday, May 3, 2024
Homeनगरडॉ. तनपुरे कारखान्याच्या बगॅसला आग; 18 लाखांचे नुकसान

डॉ. तनपुरे कारखान्याच्या बगॅसला आग; 18 लाखांचे नुकसान

राहुरी फॅक्टरी (वार्ताहर)- डॉ. तनपुरे कारखान्याच्या कार्यस्थळावर असणार्‍या बगॅसला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. मात्र, सुरक्षा कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते यांच्या सतर्कतेमुळे तातडीने अग्निशामक बंब घटनास्थळी बोलाविण्यात आले व पुढील अनर्थ टळला. या आगीत कारखान्याचे सुमारे 18 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज प्रभारी कार्यकारी संचालक भाऊसाहेब सरोदे यांनी व्यक्त केला आहे.

शनिवार दि. 16 मे रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कारखाना कार्यस्थळावर बगॅसला आग लागल्याचे लक्षात येताच सुरक्षा कर्मचार्‍यांनी तातडीने वरिष्ठांना याबाबत माहिती देऊन अग्निशामक दलाला पाचारण केले. देवळाली व राहुरी नगरपरिषदेचे अग्निशामक बंब घटनास्थळी हजर झाले व स्थानिक चेकपोस्टवर युवक कार्यकर्ते व कारखान्याचे सुरक्षा कर्मचार्‍यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण करण्यात आले. पेटलेला भुसा बाजूला काढण्यासाठी जेसीबी यंत्र घटनास्थळी आणून आग विझविण्यासाठी मदत करण्यात आली.

- Advertisement -

देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, मुख्याधिकारी अजित निकत, अभियंता सुरेश मोटे, तसेच सुरक्षा कर्मचारी संजय घोगरे, एकनाथ वरघुडे, अशोक गाडेकर, सुरेश आदमाने, पोपट नालकर, विठ्ठल म्हसे, इंद्रभान पेरणे, अशोक कदम व सुरक्षा अधिकारी बाळासाहेब तनपुरे यांच्यासह कॉलनी परिसरातील कर्मचारी तात्यासाहेब गोरे, बाळासाहेब धुमाळ, बाळासाहेब तारडे, भरत गोंधळी, शुभम कदम, मनोज डोंगरे, इश्वर दूधे, भूषण नालकर, गणेश रिंगे, शंतनू नालकर, लखन लहानगे, आदेश तारडे आदींच्या सहकार्याने या भीषण आगीवर नियंत्रण करण्यात यश आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या