Friday, May 3, 2024
Homeनगरपावसाळ्याच्या तोंडावर 135 पाणीपुरवठा योजना बंद

पावसाळ्याच्या तोंडावर 135 पाणीपुरवठा योजना बंद

पाण्याची पातळी खालावली; अनेक ठिकाणी पाईपलाईन नादुरूस्त

अहमदनगर (प्रतिनिधी)- गतवर्षी सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाला असला तरी यावर्षी जिल्ह्यात सध्या 135 नळपाणीपुरवठा योजना बंद आहेत. अनेक ठिकाणी पाण्याची पातळी खालावली असून, काही ठिकाणी पाईपलाईन खराब झाल्या आहेत. जिल्ह्यात दुपटीपेक्षाही जास्त पाऊस झाल्याचे सांगण्यात येत असले तरी पावसाळ्यापर्यंत पाण्याची बोंबाबोंब कायम राहणार आहे. जिल्ह्यात 1 हजार 450 स्वतंत्र नळपाणीपुरवठा योजना आहेत. त्यापैकी सद्यस्थितीत 1 हजार 320 पाणीयोजना सुरु आहेत. यात 23 योजना कायमस्वरूपी बंद झाल्या आहेत. बंद पडलेल्या पाणी योजनांमध्ये सर्वाधिक योजना नगर तालुक्यातील आहेत.

- Advertisement -

राज्यात गेल्या पावसाळ्यात बहुतांश ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. विशेषतः उत्तर व पश्चिम महाराष्ट्रात पावसाने रौद्ररूप धारण केल्याने नद्या दुथडी भरून वाहिल्या. नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसाने जिल्ह्यातून जाणार्‍या गोदावरी नदीला पाणी आले होते. तर पुण्यातील पावसाने भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात आला होता. अकोले तालुक्यात घाटमाथ्यावर झालेल्या पावसाने भंडारदरा व मुळा धरण भरून गेले. त्यामुळे उत्तर नगर जिल्ह्यासह नगर शहराच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली.

ज्या भागात कालवे आहेत, त्या भागात पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची चिंता कमी झाली. बंद असलेल्या 135 पाणीयोजनांपैकी 16 पाणीयोजना दुरुस्तीअभावी बंद आहेत. थकित विद्युत देयकामुळे एक तर पाण्याचा उद्भव दूषित झाल्याने सहा योजना बंद पडल्या आहेत. सध्या करोना विषाणूमुळे लॉकडाऊन असल्याने जिल्ह्यातील बहुतांश कारखाने बंद आहेत. त्यामुळे धरणांमधील पाण्याची मागणी कमी आहे. म्हणूनच धरणातील पाणीसाठी आगामी पावसाळ्यापर्यंत शेतीच्या आवर्तन व पिण्याच्या पाण्याला पुरेसा ठरेल, अशी अपेक्षा अधिकार्‍यांना आहे.

बंद नळपाणी योजना
अकोले 8, संगमनेर 5, कोपरगाव 0, राहाता 0, राहुरी 0, श्रीरामपूर 2, नेवासा 3, शेवगाव 7, पाथर्डी 6, नगर 31, पारनेर 14, श्रीगोंदा 17, कर्जत 15, जामखेड 27. एकूण 135.

- Advertisment -

ताज्या बातम्या