Saturday, May 4, 2024
Homeनाशिकविनापरवानगी वाहतुक करणार्‍या ५४ रिक्षांवर कारवाई; ११ हजार दंडाची वसुली

विनापरवानगी वाहतुक करणार्‍या ५४ रिक्षांवर कारवाई; ११ हजार दंडाची वसुली

नाशिक : देशभरात करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चौथ्या टप्प्यातील लाँकडाऊन सुरु आहे. यामध्ये सार्वजनिक वाहतुकीसह खासगी प्रवासी वाहतुकीवर बंदी आहे. परंतु शहरात अने रिक्षाचालकांनी विनापरवानगी प्रवासी वाहतूक सुरु केली आहे. अशा रिक्षांवर वाहुतुक विभागाने कारवाई सुरु केली आहे. काल दिवसभरात ५४ रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडू १० हजार ८०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत अाहे. त्यास आळा बसावा यासाठी सध्या चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू आहे. या चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये काहीशी शिथिलता लागू करण्यात आली असली तरीही सार्वजनिक प्रवासी वाहतूकीला परवानगी देण्यात आलेली नाही.

- Advertisement -

त्यामुळे शहर बससेवा बंदच आहे, त्याचप्रमाणे रिक्षावाहतूकही बंद आहे. असे असले तरी काही रिक्षाचालकांनी मात्र प्रवासी वाहतूक सुरू केली होती. विनापरवानगी सुरू झालेल्या या रिक्षातून प्रवासी वाहतुकीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेऊन शुक्रवारी (दि.२२) वाहतूक पोलिस शाखेकडून धडक कारवाई हाती घेण्यात आली होती.

त्यानुसार, पंचवटी, सिबीएस, रविवार कारंजा याठिकाणी वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. रिक्षातून विनापरवानगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ५४ रिक्षांचालकांविरोधात मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी १० हजार ८०० रुपयांचा दंड ऑनलाईन आकारला आहे.

रिक्षाचालकांकडे दंडाची रोख रक्कम भरण्यासही पैसे नसल्याने ऑनलाईन पेडिंग दंड करण्यात आलेला आहे. जो त्यांच्याकडुन नंतर वसुल करण्यात येणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या