Friday, May 3, 2024
Homeनगरनगरमध्ये नवे दोन बाधित

नगरमध्ये नवे दोन बाधित

जिल्ह्यात करोना बाधितांचा आकडा 249

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात करोनाची व्याप्ती वाढण्यास सुरूवात झाली आहे. मुंबई-पुण्याच्या पाहुण्यामुळे जिल्ह्यातील करोना पॉझिटिव्हचा आकडा झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात करोनाचा उद्रेकच झाला असून दिवसभरात या ठिकाणी नव्याने आठ तर नगर शहरात दोघांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा 249 वर पोहचला आहे. मात्र, दुसरीकडे जिल्ह्यात करोना मुक्त होणार्‍यांची संख्या झपाट्याने वाढत असून आतापर्यंत 186 रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

- Advertisement -

नगर शहरातील सारसनगर येथील 58 वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती यापूर्वी बाधित झालेल्या व्येीच्या संपर्कातील ही व्येी आहे. तसेच गजानन कॉलनी एमआयडीसी येथील गुरूवारी बाधित आलेल्या व्येीची पत्नीही शुक्रवारी सायंकाळी करोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. यामुळे करोना बाधितांचा जिल्ह्याचा आकडा 249 वर पोहचला आहे.

52 केसेस अ‍ॅक्टिव्ह
जिल्ह्यातील बाधितांचा आकडा हळूहळू पुढे सरकत 249 पयरत पोहचला आहे. यातील 186 रु1/2णांनी करोनावर यशस्वी मात केली असून सध्या जिल्ह्यात 52 अ‍ॅि3टव्ह केसेस आहेत. बाधित आढळलेल्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रात 55, उर्वरित जिल्हा 140, इतर राज्य 3, इतर देश 8 इतर जिल्हा 50 अशी रु1/2ण संख्या आहे.

राहात्यात आणखी दोन रुग्ण; 12 जण क्वारंटाईन

राहाता (तालुका प्रतिनिधी) – राहाता शहरात काल आणखी दोन करोनाबाधीत सापडल्याने एकूण बाधितांची संख्या 6 झाली असून दोघा जणांच्या संपर्कात आलेल्या 12 जणांना कॉरंटाईन करण्यात आले असल्याची माहिती राहाता ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. गोकुळ घोगरे यांनी दिली.

तीन दिवसापूर्वी शहरात करोनाचा पहिला रूग्ण सापडला होता. त्याच्या संपर्कात आलेल तीन जण दुसर्‍या दिवशी करोना बाधीत निघाले तर काल तिसर्‍या दिवशी आणखी दोघे बाधीत निघाल्याने एकूण बाधीतांची संख्या सहावर

- Advertisment -

ताज्या बातम्या