Tuesday, May 21, 2024
Homeदेश विदेशकरोना : 38 बैठकांंनंतर ठरणार मोदी, शाह सरकारचा 2 महिन्याचा अ‍ॅक्शन प्लॅन..!

करोना : 38 बैठकांंनंतर ठरणार मोदी, शाह सरकारचा 2 महिन्याचा अ‍ॅक्शन प्लॅन..!

नवी दिल्ली – करोना या जागतिक महामारीवर भारत देश मात करण्यात अपयशी ठरत आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने आता पुढील दोन महिन्यात देशातून कोविड 19 ला हद्दपार करण्याचे लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी ठरवले आहे. त्यासाठी पुढील 98 तासांमध्ये किमान 38 बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे.

या बैठकीत देशातील संपूर्ण राज्यांचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर देशात करोनावर मात करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याचे ठरणार आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या पाच राज्यांना फोकस करून पुढील कालावधीचा अ‍ॅक्शन प्लॅन ठरवण्यात येणार असल्याची माहिती केंद्र सरकारच्या यंत्रणेने दिली आहे. त्यासाठी पुढील तीन-चार दिवस राज्यनिहाय आढावा बैठका घेण्यात येणार आहेत. मग पुढील आदेश व दिशानिर्देश जारी केले जातील.

- Advertisment -

ताज्या बातम्या