Saturday, May 4, 2024
Homeनाशिकबंद दवाखान्याचे शटर तोडून सात लाख रुपयांची चोरी

बंद दवाखान्याचे शटर तोडून सात लाख रुपयांची चोरी

नाशिक रोड : Nashikroad

जेलरोड येथे असलेल्या त्रिवेणी पार्कमध्ये एका बंद दवाखान्याचे शटर तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे सात लाख रुपये चोरून नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

डॉक्टर कुलदीप प्रदीप कुमार बोरकर यांचा जेलरोड येथील त्रिवेणी पार्कमधील इंद्रकुटी अपार्टमेंट मध्ये दवाखाना असून डॉक्टर बोरकर यांना घर घ्यायचे असल्याने ते रोज दवाखान्यात पैसे जमवून टेबल खालील ड्रावर मध्ये ठेवत असंत. गेल्या काही दिवसापासून पैसे जमा करत होते. सुमारे सात लाख रुपये आतापर्यंत जमा झाले होते.

दरम्यान रुग्ण तपासाचे काम आटोपल्यानंतर ते आपला दवाखाना बंद करून गेले होते. त्यानंतर मध्यरात्री अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद दवाखान्याचे शटर तोडून आत प्रवेश करून टेबलच्या ड्रॉवर मध्ये असलेले सुमारे सात लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना डॉक्टर बोरकर यांना समजताच त्यांनी तातडीने दवाखान्यात जाऊन तपासणी केली असता टेबलच्या ड्रॉवर मध्ये असलेले सात लाख रुपये चोरी गेल्याचे त्यांना आढळले. त्यानंतर त्यांनी तातडीने नाशिकरोड पोलीस स्टेशनला येऊन अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या