Friday, May 17, 2024
Homeनाशिकनाशकात विविध धार्मिक कार्यक्रम

नाशकात विविध धार्मिक कार्यक्रम

पंचवटी । Panchvati वार्ताहर

आयोद्धेत होणार्‍या राममंदिर निर्माणाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्येही आजपासून तीन दिवस विविध धार्मिक सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला.

- Advertisement -

नाशिकच्या विविध धार्मिक संघटनांसह आखाड्यांच्या महंतांनी नाशिकला विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सोमवारी सकाळी 10 वाजता तपोवनातील कपिल संगमानजीक असलेल्या भारत सेवा आश्रमात रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालिसा पठण करण्यात आले.

त्याचप्रमाणे विविध तीर्थक्षेत्रांसह प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकची माती तसेच पवित्र गोदावरीचे जल आणून त्याचे विधीवत पूजन करून ते आयोद्धेकडे रवाना करण्यात आले.

उद्या मंगळवारी सकाळी 10 वाजता आडगाव नाक्यावरील पंचमुखी हनुमान मंदिरात रामरक्षा स्तोत्र पठण, हनुमान चालिसा पठण करण्यात येणार आहे. दुपारी 12 वाजता प्रभू श्रीरामाची आणि हनुमानाची आरती करून प्रसाद वाटप करण्यात येणार आहे तर सायंकाळी 7 वाजता पेठरोडवरील कैलास मठात सहस्त्र दीप प्रज्वलित करून शिवमहिमा स्तोत्र पठण आणि नंतर आरती करण्यात येणार आहे.

बुधवारी (दि. 5) सकाळी 10 ते 11 वाजेदरम्यान गोदातीरी असलेल्या रामकुंडावरील अतिप्राचीन श्रीराम स्तंभाचे तसेच प्रभू श्रीराम आणि हनुमानाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर गंगा गोदावरीची आरती करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या