Tuesday, May 7, 2024
Homeदेश विदेशमाजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक

नवी दिल्ली:

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी (Pranab mukherjee) यांची प्रकृती नाजूक आहे. त्यांना व्हेटिलेंटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. दरम्यान त्यांची मुलगी शर्मिष्ठा यांनी वडिलांच्या प्रकृतीसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी ‌भावूक टिवट केले आहे. शर्मिला यांनी म्हटले की, वर्षभरापूर्वी वडिलांना ‘भारत रत्न’ पुरस्कार देवून त्यांचा गौरव झाला होता. आता वर्षभरानंतर त्यांची प्रकृती नाजूक आहे. मागील 8 ऑगस्ट माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस होता. कारण त्या दिवशी त्यांना ‘भारत रत्न’ देण्यात आले होते. आता ‌‌वर्षभरानंतर 10 ऑगस्ट रोजी ते गंभीररित्या आजारी पडले. ईश्वर त्यांच्यासाठी सर्वकाही चांगले करेल व मला जीवनात सुख व दु:ख समान रुपाने स्वीकारण्याची शक्ती देईल. त्यांची चिंता केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते.प्रणब मुखर्जी यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया केली गेली आहे. त्यापुर्वी त्यांना करोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या