Friday, May 3, 2024
Homeजळगावकारागृहातून पळालेल्यापैकी एक आरोपी पोलिसांना गवसला

कारागृहातून पळालेल्यापैकी एक आरोपी पोलिसांना गवसला

जळगाव – Jalgaon प्रतिनिधी :

करागृहाच्या मुख्य प्रवेशव्दारावर नेमणूकीस असलेल्या कारागृह रक्षकास पिस्तुलचा धाक दाखवून सिनेस्टाईल पसार झालेल्या तिघा आरोपींपैकी

- Advertisement -

जळगाव कारागृहातून तीन आरोपी फरार

एकास अटक करण्यात पोलिसांना यश आले असून, शुक्रवारी यातील एका आरोपीला स्थनिक गुन्हे शाखेच्या पथकाने नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथून अटक केली आहे.

काही दिवसांपुर्वी कारागृहातून एका बडतर्फ पोलीस कर्मचार्‍यासाठी तिघे बंदी करागृह रक्षकाला पिस्तुलाचा धाक दाखवून पसार झाले होते.

दरम्यान या आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली होती. यातील पथकाने दोन दिवसांपुर्वी या तिघाही आरोपींना मोटारसायकलहून पळुन जाण्यास मदत करणार्‍या जगदिश पुंडलीक पाटील रा. पिंपळकोठा या आरोपीला अटक केली होती.

दरम्यान इतर आरोपींच्या शोधात असलेल्या पोलिस हवालदार कमलाकर बागुल, रवींद्र पाटील, रामकृष्ण पाटील, मुरलीधर बारी या पथकाने नवापूर येथून तिघा आरोपींपैकी एक असलेल्या सागर संजय पाटील (वय २४) रा. पैलाड, अमळनेर यास अटक केली.

उर्वरीत आरोपींचा शोध पोलीस उपनिरीक्षक लहारे, विजय पाटील, दिनेश बडगुजर, विजयसिंग पाटील, शरद भालेराव, नंदू पाटील, दत्तात्रय बडगुजर, दीपक शिंदे, परेश महाजन, विजय पाटील, रमेश जाधव, इद्रीस पठाण, किरण धनगर, दीपक पाटील, जितेंद्र पाटील हे घेत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या