जळगाव : Jalgaon
जळगाव जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या चीन्या उर्फ रवींद्र जगताप या बंदयाचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर कारागृहात त्याला झालेल्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे .शनिवारी त्याच्या मृतदेहाचे इन कॅमेरा शवविच्छेदन जिल्हा रुग्णालयात सुरू असताना नातेवाईकांनी प्रचंड गोंधळ करीत कारागृह अधिक्षकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.