Friday, May 3, 2024
Homeजळगावसरपंचपदाचा मुकूट अधांतरीच !

सरपंचपदाचा मुकूट अधांतरीच !

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यातील मुदत संपुष्टात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदावर त्या आरक्षित जागेनुसारच गावातील जाणत्या व्यक्तीची निवड करण्यात यावी, असे निर्देश ग्रामविकास प्रशासनाला देण्यात आले होते.

- Advertisement -

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे अजून काही महिने तरी ग्रामपंचायतीच्या निवडणुका होण्याची शक्यता नाही,

त्यामुळे सदस्य सरपंचपदावर आरूढ होऊन मुकूट धारण करण्याचेच नव्हेतर प्रशासक पदाचे स्वप्न देखिल अधांतरीच राहिले आहे असून जिल्हयातील मुदत संपुष्टात आलेल्या ग्रामपंचायतींवर जिल्हा परीषद प्रशासनाकडून लोकसेवकांचीच वर्णी लागली असून प्रशासक प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगीतले.

जिल्हयातील अकराशे बावन्न ग्रामपंचायतीपैकी 780 ग्रामपंचायतींची मुदत ऑगस्ट अखेर संपुष्टात आली आहे. या मुदत संप्ाुष्टात आलेल्या ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणुका सप्टेंबरमध्येे होणे आवश्यक होते. मात्र, कोरोनामुळे ते शक्य नाही.

हौशा,गौशा,नवशांची फिल्डिंग कुचकामी

जिल्हयातील 780 ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया दि. 8 सप्टेंबरपासून अंमलबजाणी करण्यात आल्याने ग्रामपंचायतीव्दारे सदस्य, सरपंचपदाचा मुकूट अधांतरीच राहिला असून जिल्हा परीषद प्रशासनाकडून प्रशासक पदासाठी लोकसेवकांचीच वर्णी लागली आहे.

गावातील हौशी युवक पदाधिकारी आमदार, पालकमंत्र्यांकडे जाउन प्रशासक म्हणून वर्णी लावण्यात यावी यासाठी कधीपासून फि ल्डिंंग लावत होते. मात्र, फिल्डिंग कुचकामी ठरली आहे.

प्रशासक नियुक्तीचे अधिकार सीईओंना

सहकारी संस्था, जिल्हा बँक तसेच ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत.

राजपत्रमधील तरतुदीनुसार नैसर्गीक आपत्ती, आणीबाणी,युद्ध,वित्तीय महामारी यामुळे निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार निवडणूका घेणे शक्य नसेल तर ग्रापं परीपत्रक शासननिर्णयानुसार अशा परीस्थितीत मुदत संपुष्टात आलेल्या ग्रामपचांयतीवर प्रशासक नियुक्तीचे अधिकार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहेत.

निवडणूक प्रक्रियेला ऐनवेळी स्थगिती

जिल्ह्यात मस्कावद सीम, मस्कावद खुर्द,सह अन्य एक अशा रावेर तालुक्यातील तिन ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक प्रकिया सुरू करण्यात येणार होती.

परंतु त्याच कालावधीत राज्यात कोरोना साथरोग प्रसार प्रादूर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलंबजावणी लागू करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

त्यामुळे निवडणूक प्रक्रियेला स्थगितीमुळे या ग्रामपंचायतीवर यापूर्वी प्रशासक नियुक्त करण्यात आले असल्याचे महसूल उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या