Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशबाबरी विध्वंस : २७ वर्षानंतर या दिवशी लागणार निर्णय

बाबरी विध्वंस : २७ वर्षानंतर या दिवशी लागणार निर्णय

लखनऊ :

बाबरी विध्वंस प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या सीबीआयच्या विशेष न्यायालय आता निकाल देणार आहे. २७ वर्षांनंतर हा निकाल येणार आहे.अयोध्येत ६ डिसेंबर १९९२ ला कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली होती.

- Advertisement -

बाबरी विध्वंस प्रकरणात दोन्ही पक्षांचा युक्तीवाद १ सप्टेंबरला संपला आहे. यानंतर विशेष न्यायाधीशांनी निर्णय लिहायला सुरुवात केली. हा निकाल ३० सप्टेंबरला येणार आहे. भाजप नेते माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग, विनय कटियार आणि उमा भारतीसह सर्व आरोपींना निकालाच्या दिवशी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील ३२ मुख्य आरोपी आहेत.

१७ आरोपींचा मृत्यू

बाबरी विध्वंस प्रकरणात ६ डिसेंबर १९९२ रोजी एफआयआर दाखल केले होते. त्यावेळी ४९ आरोपी होते. त्यातील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, अशोक सिंघल, गिरिराज किशोर, विष्णुहरि डालमिया सह १७ जणांचा मृत्यू झाला आहे.सीबीआयने याप्रकरणी ३५१ साक्षीदार आणि ६०० कागदपत्रे असलेले पुरावे न्यायालयात सादर केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या