Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक जिल्ह्यातील २४ धरणांत ९५ टक्के जलसाठा

नाशिक जिल्ह्यातील २४ धरणांत ९५ टक्के जलसाठा

नाशिक । Nashik

सप्टेंबरमध्येही जिल्ह्यावर वरुण राजाची कृपादृष्टी कायम अाहे. जिल्ह्यातील २४ धरणांत एकूण ९५ टक्के जलसाठा आहे. जवळपास सर्वच धरणे शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत.

- Advertisement -

दारणा, गिरणा, नांदूरमध्यमेश्वर या धरणांतून विसर्ग सुरु आहे. धरणे तुडूंब भरलेली असल्याने वर्षभराचा पिण्याचा व शेतीसाठी आवर्तनाचा पाणी प्रश्न मार्गी लागला आहे.

नाशिक जिल्हा हा धरणांचा जिल्हा म्हणून अोळखला जातो. यंदा मात्र जून व जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने जिल्हावासियांच्या चिंता वाढली होती. जुलै अखेर धरणांत जेमतेम ४० टक्के जलसाठा शिल्लक होता. नाशिककरांची तहान भागविणारे धरण ही गंगापूर धरणाची अोळख. गंगापूर धरणातही ५० टक्के जेमतेम साठा होता. त्यामुळे ऐन करोना संकटात जिल्हावासियांवर पाणीबाणीचे संकट उभे ठाकले होते.

पण निसर्गाने आॅगस्टमध्ये आभाळमाया केली. जिल्ह्यात सर्वदूर जोरदार तर कुठे मध्यमस्वरुपाचा पाऊस झाला. परिणामी धरणांतील जलसाठयातही दमदार वाढ झाली. सप्टेंबरमध्येही पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. गंगापूर, दारणा, गिरणा यांसह १४ धरणे शंभर टक्के भरली आहे.

सदयस्थितीत पालखेड धरणातून ४३७ क्यूसेस, दारणातून ८३०, वालदेवी १०७, कडवा २१२, भोजापूर १९०, चणकापूर ४५४ व हरणबारी ५२३ क्यूसेसने विसर्ग सुरु आहे. सर्वाधिक विसर्ग नांदूरमध्यमेश्वर बंधार्‍यातून १५ हजार क्यूसेसने विसर्ग सुरु आहे. त्या खालोखाल गिरणा धरणातून ७ हजार ४२८ क्यूसेसने विसर्ग सुरु आहे.

हवामान खात्याने पुढिल काळात आणखी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. ते बघता सर्व धरणे शंभर टक्के भरण्याची चिन्हे असून पुढिल काळात विसर्ग वाढण्याची चिन्हे अाहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या