Friday, May 17, 2024
Homeदेश विदेशCOVID-19 : देशात आजपर्यंत ९४ हजाराच्यावर रुग्णांचा मृत्यू

COVID-19 : देशात आजपर्यंत ९४ हजाराच्यावर रुग्णांचा मृत्यू

दिल्ली | Delhi

देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या २४ तासात देशात ८८ हजाराच्यावर रूग्ण आढळून आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,

- Advertisement -

गेल्या २४ तासात १ हजार १२४ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासात ८८ हजार ६०० रूग्ण आढळले आहे. देशातील एकूण करोना बाधितांची संख्या ५९ लाख ९२ हजार ५३३ इतकी झाली आहे. त्यातील आजपर्यंत ४८ लाख ४९ हजार ५८५ रूग्ण करोनामुक्त झाले असून ९ लाख ५६ हजार ४०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आजपर्यंत ९४ हजार ५०३ रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

गेल्या २४ तासात ९ लाखाच्या वर चाचण्या

ICMR ने दिलेल्या माहितीनुसार, कालपर्यंत देशात एकूण ६,१२,५७,८३६ नमूने तपासण्यात आले. त्यातील ९ लाख ८७ हजार ८६१ नमूण्यांची काल तपासणी झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या