Tuesday, May 7, 2024
Homeराजकीयआंध्रप्रदेश सरकारप्रमाणे महाराष्ट्रातही 'दिशा कायदा' संमत करावा

आंध्रप्रदेश सरकारप्रमाणे महाराष्ट्रातही ‘दिशा कायदा’ संमत करावा

मुंबई | Mumbai

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्कारानंतर सर्वच स्तरातून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. तर राजकीय वातावरण देखील चांगलेच तापत असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी राज्य सरकारला पत्र लिहित आंध्रप्रदेश सरकारप्रमाणे महाराष्ट्रातही ‘दिशा कायदा’ संमत करावा अशी मागणी केली आहे.

- Advertisement -

आमदार राजू पाटील यांनी लिहिलेल्या पत्रात म्हंटले आहे, “आंध्रप्रदेश सरकारने विधानसभेत शुक्रवारी दिनांक 13/12/2019 रोजी क्रिमिनल लॉ कायदा पास करून अशा प्रकारचा कायदा करणारे देशातील पहिले राज्य बनण्याचा मान मिळवला आहे. त्याबद्दल आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी व त्यांच्या सरकार अभिनंदनास पात्र आहे. सदर कायद्यामध्ये आय.पी.एस कलम 354 मध्ये सुधारणा करून नवीन 354 (ई) बलात्कार अशा प्रकारचा गुन्हा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्यानंतर पहिल्या सात दिवसात व पुढच्या चौदा दिवसात न्यायालयात जलद गतीने सुनावणी घेऊन एकवीस दिवसांच्या आत दोषींनी फाशी सारखा शिक्षा देण्याती तरतुद करण्यात आल आहे.

महाराष्ट्रातही बलात्काराच्या घटना वारंवार घडत आहेत, अशा प्रकारचा गुन्हा घडल्यानंतर न्यायालयात वर्षानुवर्ष तपास आणि सुनावणी सुरु असते. त्यामुळे गुन्हेगारांवर कायद्याचा धाक राहिलेला नाही. तसेच बलात्कार प्रकरणातील पीडितेला योग्य न्याय मिळण्यास मोठा कालावधी लागत आहे. यामुळे महाराष्ट्रातही आंध्रप्रदेशप्रमाणे कठोर कायदा वेळ आतता आलेली आहे. राज्यातील जनता अशा प्रकारच्या कायद्याची वाट पाहत आहे. तरी कृपया आपण बलात्कार पिडितांना जलद गतीने न्याय देण्यासाठी व दोषींना कठोर शिक्षा मिळून, अशा घटनांच्या आळा बसावा याकरिता आंध्रप्रदेश सरकारप्रमाणे महाराष्ट्रतही दिशा कायदा संमत करावा. ही विनंती.”

- Advertisment -

ताज्या बातम्या