Saturday, May 4, 2024
Homeनाशिकएसटी सेवकांना मिळाले एक महिन्याचे वेतन

एसटी सेवकांना मिळाले एक महिन्याचे वेतन

नाशिक । प्रतिनिधी

करोनामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम झाला असून, सेवकांचे मागील तीन महिन्यांपासून वेतन थकले होते.

- Advertisement -

पैकी बुधवारी (दि.7) एसटी सेवकांना जुलै महिन्याचे वेतन अदा करण्यात आले असून, अद्यापही दोन महिन्यांच्या वेतनाची प्रतीक्षा कायम आहेे. वेतन कायद्यानुसार एसटी महामंडळाने वेळेवर वेतन देणे बंधनकारक आहे.

मात्र, निधी नसल्याने एसटी प्रशासनाने राज्य सरकारकडून आर्थिक मदत मागितली आहे. आर्थिक मदत वेळेत न मिळाल्याने सेवकांचे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांचे वेतन थकले होते. केवळ जुलै महिन्याचे वेतन मिळाल्याने सेवक हवालदिल झाले आहेत.

दरम्यान, या पूर्वीच तिन्ही महिन्यांचे वेतन न झाल्यास महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेने शुक्रवारी (दि.9) राज्यभर आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासनाने एक महिन्याचे वेतन दिल्याने आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी संघटनेची बैठक बुधवारी (दि.7) रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या