पेठ | Peth
रस्त्याने पायी चालणाऱ्या वृद्धास दुचाकीस्वाराने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू घटना शहरात घडली आहे.
- Advertisement -
शहराजवळील जोगमोडी रोडवरील संगमेश्वर महादेव मंदीरा जवळ ही घटना घडली.
जोगमोडीकडून पेठकडे येणारा मोटरसायकलस्वार दिपक देवाजी कामडी (रा. शिवरपाडा ता. दिंडोरी) मोटरसायकल क्रमांक एमएच १५ , बीक्यू६५७१ भरधाव वेगाने येत असतांना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याने पायी जाणारे लक्ष्मण काळू गांगोडे (६० रा . जुनोठी) यांना जोरदार धडक दिली.
या अपघातात गांगोडे यांच्या डोक्यास जबर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी नाशिकला नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला.
या संदर्भात हनुमंत गांगोडे यांनी तक्रार दिल्याने पेठ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली असुन हवा. जाडर आधिक तपास करीत आहेत.