Friday, May 17, 2024
Homeमुख्य बातम्यायेत्या शनिवारी घडणार ब्ल्यूमूनचे दर्शन; काय आहे संकल्पना? जाणून घ्या

येत्या शनिवारी घडणार ब्ल्यूमूनचे दर्शन; काय आहे संकल्पना? जाणून घ्या

नवी दिल्ली |प्रतिनिधी New Delhi

महिन्यातून एकदा होणारे पूर्ण चंद्राचे दर्शन ऑक्टोबर महिन्यात मात्र दोनदा होणार आहे. एकाच महिन्यात दोनदा चंद्र दिसून आल्यास यातील दुसऱ्या चंद्राला ब्यू मून संबोधले जाते.

- Advertisement -

येत्या शनिवारी रात्री ८.१९ वाजता हा ‘ब्लू मून’ बघता येणार आहे. २ ऑक्टोबर रोजी पहाटे २.३५ वाजता महिन्यातील पहिले पूर्ण चंद्रदर्शन झाले होते. त्यानंतर आता महिनाखेरला ३१ ऑक्टोबरला दुसऱ्यांदा पूर्ण चंद्र दर्शन होणार आहे.

उगवणारा चंद्र लालसर रंगाचा असतो. पण चंद्र जेव्हा क्षितिजापासून अधिक उंचीवर पोहोचतो तेव्हा पृथ्वीवरील परावर्तीत प्रकाशामुळे चंद्र पांढऱ्या रंगाचा दिसतो. त्यात करडय़ा छटा मिसळल्याने तो निळसर भासतो असे म्हटले जाते. मात्र, या सर्व घटनेचा ‘ब्लू मून’च्या व्याख्येशी कुठलाही संबंध नसल्याचे सांगितले जात आहे.

एखाद्या दुर्मीळ प्रसंगाला इंग्रजीत ‘वन्स इन अ ब्लू मून’ असे म्हणतात. १७ व्या शतकात याचा सर्वात आधी वापर करण्यात आला.दरवर्षी प्रत्येक महिन्याला एक असे वर्षाला १२ पुर्ण चंद्र दिसतात. ब्लू मूनमुळे यंदा १३ पूर्ण चंद्र दिसणार आहे.

यापूर्वी अशी घटना ३० जून २००७ रोजी घडली होती. त्यानंतर असा प्रसंग ३० सप्टेंबर २०५० रोजी येईल. २०१८ साली ३१ जानेवारी आणि ३१ मार्च अशा दोन दिवशी ‘ब्लू मून’ दिसले होते. पुढील ‘ब्लू मून’ ३१ ऑगस्ट २०२३ रोजी दिसेल असे तज्ञ सांगतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या