मुंबई : राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादी निश्चित झाली आहे. या यादीत भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल झालेले एकनाथ खडसे यांचीही नाव आहे. परंतु खडसे यांच्या नावाला सामाजिक विरोध होत आहे.
एकनाथ खडसे यांचं नाव राष्ट्रवादीकडून राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी पाठवण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. त्यांनी एकनाथ खडसे यांचे नाव यादीत येणे हे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे. भ्रष्टाचारी नेत्याला पुन्हा एकदा राजकारणात आणले जात आहे. खडसे हे पुन्हा जर राजकारणात सक्रीय झाले तर भ्रष्टाचाराविरोधी लढ्याला काही अर्थ राहणार नाही, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली पण गुन्हा दाखल नसल्याने कोर्टात आणखी लढा द्यावा लागणार आहे.