Friday, May 3, 2024
Homeभविष्यवेधदोषपूर्ण भाग्यरेषा

दोषपूर्ण भाग्यरेषा

प्रफुुुल्ल कुलकर्णी,ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड-8888747274

तुटलेली, यवयुक्त, जाड, मस्तक रेषा व हदय रेषेपर्यंतच पोहचलेली, सर्पासारखी वळण घेतलेली, दोषपूर्ण चिन्हांनी युक्त, अशी भाग्यरेषा आयुष्याच्या ज्या वयात वा टप्प्यावर असेल त्या त्यावेळी ती अनिष्ट फळ देते.

- Advertisement -

उदा. दोषपूर्ण भाग्य रेषा प्रत्येक कामासाठी बाधा व संकटे निर्माण करते, शिक्षण, विवाह, नोकरी, पती-पत्नी मध्ये तणाव, मानसिक अशांतता निर्माण करते. जोपर्यंत भाग्यरेषेत दोष आहे, त्या त्या वयात खर्च जास्त होतो व संकटे येतात.

भाग्यरेषेचा दोष असेपर्यंत व्यक्तीच्या जीवनात निराशा येते, या निराशेपोटी, क्रोध, अविचार, प्रेमात फसणे त्यामुळे व्यक्तीचे स्वत:वरील नियंत्रण जाते. स्वत:वरील नियंत्रण गमावून बसल्यामुळे व्यक्ती व्यसनी, जुगारी होते.

स्त्रियांच्या हातावर दोषपूर्ण भाग्यरेषा असल्यास घरी कष्ट, दारिद्रय, असुविधा व अव्यवस्था राहते, अशा स्त्रियांना लग्नानंतर अधिक कष्ट करावे लागतात. भाग्यरेषेमध्ये जसजसा सुधार दिसून येईल तसे जीवनात स्वस्थता लाभायला सुरुवात होते, सुखा समाधानाचे दिवस येतात.

भाग्य रेषा- या रेषेवरुन मुख्यत: त्या व्यक्तीला मिळणारा पैसा, त्या व्यक्तीची आर्थिक क्षमता व एकंदरीतच आर्थिक जीवनाची वाटचाल समजते. ही रेषा मनगटाकडून शनि उंचवट्याकडे जाताना कोठूनही उगम पावते, मात्र ही रेषा शनि उंचवट्यावरच जायला पाहिजे.

मानवी जीवनाच्या आर्थिक बाबी कशा आहेत ते हीे रेषा दाखवित असते. भाग्य रेषा आर्थिक बाबी बरोबरच वैवाहिक संंबंधाच्या काही बाबी दाखविते. या शिवाय या रेषेवर कुठल्याही इतर गोष्टी प्रगट होत नाहीत.

या रेषेला दैव रेषा ही म्हणले जाते. जेव्हा आर्थिक संपन्नता असते तेंव्हा त्या व्यक्तिला तिचे दैव साथ देत असते. उत्तम दर्जाच्या भाग्य रेषेबरोबर, चांगले आरोग्य, बुध्दी, निश्चय, महत्वाकांक्षा, हयागोष्टी सुध्दा उत्तमप्रकारे त्या व्यक्तिमध्ये असतात. यशाचे श्रेय हे प्रथमत: महत्वकांक्षा, बुध्दी व आरोग्य या गुणांना देता येईल. जे प्रयत्नाशिवाय प्राप्त झाले त्याला दैव म्हणता येईल.

परन्तु प्रयत्न न करणार्‍यांना, दिवास्वप्न पहाणार्‍यांना असे नेहमी वाटते की, त्यांचे नशीब फळफळेल, जादूची कांडी फिरावी तसे नशिब पालटेल. परन्तु उद्योगप्रिय व कामाची आवड, दूरदृष्टी, संधीचा लाभ उठवण्याची कूवत, यामुळेच यघा लाभते, यशाबेरोबरच अर्थकारणही सुधारते.

भाग्य रेषा नागमोडी असेल तर आर्थिक विवंचना कायम स्वरूपी असते, आर्थिक घडी कधीच सुरळीत होत नाही, सधारत नाही.

भाग्य रेषा ठळक जाड पसरट व उथळ असेल तर फक्त पोट भरण्याइतके पैसे मिळतात परंतु पैसे बाजूला पडत नाही, घरदार जमीन जुमला हौस मौज होत नाही, आर्थिक अडचण कायम स्वरूपी असते.

हातावर भाग्य रेषांचा समूह मोठ्या संख्येने असेल व खूप दाटीवाटीने रेषा शनी उंचवट्याकडे जात असतील तर विविध मार्गाने आर्थिक अवाक होते पण ती कधीच पुरेशी नसते

शनी ग्रहाकडे मधोमध न जाता थोडी तिरकी गेल्यास अश्या व्यक्तींच्या जवळ रोख पैसा राहत नाही, पैसा येतो तो खर्ची पडतो. भाग्य साथ देणारे असेल तर आलेला पैसा बँकेत साठवतात,स्थावर घेतात, शेयर्स व अन्य मार्गात गुंतवितात यांच्या भरपूर आर्थिक होऊनही ह्यांचे खिसे रिकामे असतात. अशी तिरकी भाग्य रेषा असता आर्थिक संपन्नता येत नाही कारण त्या आलेल्या पैशाचा उपभोग न घेता तो पैसा व्याज मिळवण्यासाठी वा इतरत्र आणखी वाढ होण्यासाठी त्या लालचेपोटी लावला जातो. असे लोक आर्थिक उत्पन्नाबाबत समाधानी नसतात.

भाग्य रेषा जाड बारीक असेल तर, ती जेंव्हा बारीक असते तेंव्हा अर्थकारण सुधारते, जाड झाल्यावर आर्थिक घडी परत बिघडते.

भाग्य रेषेवर जितक्या आडव्या रेषा छेद देत असतील त्या वय वर्षात खर्च नक्की होतो तो खर्च, आजारपण, शिक्षण, वास्तू, लग्नकार्यसुद्धा असू शकते किंवा तो विनाकारणही असू शकतो मात्र खर्च हा आडव्या रेषा छेदल्यानें नक्की होतो.

भाग्य रेषा ठीक ठिकाणी हातावर लुप्त झाली असेल तर त्या वय वर्षात उत्पन्न शून्य होते व्यक्ती कर्ज बाजरी होते, धंद्यात अथवा नोकरी जाते तिच्यात बदल होतो व ह्या बदलामुळे तोटा सहन करावा लागतो, आथिर्क स्थितीत कायम चढ उतार राहतात.

हातावरील भाग्य रेषा जाड, अथवा पसरट व उथळ असेल तर भाग्य साथ देत नाही आर्थिक विवंचना कायम असते जेमतेम पोट भरण्याइतके उत्पन्न असते. भाग्यरेषा जितकी बारीक व चमकदार इतर हातावरील रेषेपेक्षा असेल व सरळ शनी ग्रहाकडे निर्दोष जाणारी असेल तर आर्थिक उत्पन्न भरपूर असते.

हातावरील इतर रेषेपेक्षा गडद रंगावर असेल अथवा ती काळपट असेल, तिच्या भवती काळ्या रंगाची अभ्रा असेल तर आर्थिक उत्पन्न तुटपुंजे असते. हातावरील भाग्यरेषा व्यक्तीच्या कर्तृत्वाने शुभ अशुभ होते, तिच्यात वेगाने बदल घडून येतात. व्यक्तीच्या भाग्यात असणारे सुगीचे दिवस ओळखून नेटाने कष्ट घेतले तर भाग्य रेषा दुप्पट फळ देते. हस्तसामुद्रिकशास्त्रात व्यतीच्या हातावरील सुगीचा, आर्थिक लाभाचा काळ अचूक काढता येतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या