Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यामुळाण्याच्या 'त्या' चारही नराधमांना पोलीस कोठडी

मुळाण्याच्या ‘त्या’ चारही नराधमांना पोलीस कोठडी

सटाणा |तालुका प्रतिनिधी

विवाहीत महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत तिला एका घरात डांबून अनेक दिवस तिच्यावर सामूदायिक अत्याचार करणाऱ्या चार नराधमांना सटाणा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. न्यायालयाने या चौघांना पोलीस कोठडी सुनावली आहे…

- Advertisement -

सटाणा शहरातील एक विवाहित महिला हो पतीशी झालेल्या किरकोळ भांडणामुळे घर सोडून सुरत येथे माहेरी जाण्यास निघाली. दोधेश्वरजवळ एका निर्जनस्थळी ही पीडित महिला रडत बसली असता, सचिन खोताडे (वय ३२ रा. मुळाणे ता.बागलाण) याने तिला माहेरी सोडण्याचे अश्वासन देत दोधेश्वर डोंगराजवळ असलेल्या त्याच्या घरी नेले.

तेथेच रात्री तिच्यावर अत्याचार केला. सकाळी महिलेने विनवण्या करूनही घरी न सोडता आपल्या संदीप नावाच्या मित्राला बोलवून पुन्हा तिच्यावर सलग काही दिवस अत्याचार केला. या कालावधीत इतर काही मित्रांनी त्यांना जेवणाचे डबे पोहोचविले.

अखेर काही दिवसांनी त्यांनी तिला सुरत बसमध्ये बसवून दिले. सुरत गेल्यावर महिलेने आईला घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितले. त्यानंतर पीडितेने आईसह थेट सटाणा पोलिस स्टेशन गाठून निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांना सगळा प्रकार सांगितला.

सटाणा पोलिसांनी तातडीने पाऊले उचलून चार आरोपींना अवघ्या काही तासांतच अटक केली. संदीप नाडेकर ( वय ४०), सचिन खोताडे (वय ३२), पपू नाडेकर (वय ३६), भगवान गवळी (वय ३८ सर्व रा. मुळाणे) अशी संबंधितांची नावे असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

या चौघांनाही न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या