Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी साधणार संवाद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी साधणार संवाद

मुंबई | Mumbai

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री आठ वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनतेला संबोधित करतील. उद्धव ठाकरे आज नेमकं काय बोलणार ? काय जाहीर करणार? याकडे सर्वांचे लक्ष सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट, मुंबईत करोनाचा चढता क्रम, मंदिरातील गर्दी, शाळा पुन्हा सुरु करणे, वाढीव वीजबिलावर सवलत, लॉकडाऊन यांसह अनेक विषयांवर उद्धव ठाकरे भाष्य करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र उद्धव ठाकरे नेमकं कोणत्या विषयी बोलणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीत करोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. दिल्लीत दर दिवशी हजारो लोकांना करोनाची बाधा होत आहेत. तर दिल्ली पाठोपाठ मुंबईची परिस्थिती चिंताजनक होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याशिवाय करोनाचा वाढता आकडा, लोकलमध्ये गर्दी, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे यांसह अनेक कारणामुळे लोकलचा निर्णय लांबणीवर पडला आहे. करोनाचा वाढता आकडा पाहता मुंबईतील सर्व शाळा मात्र 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या