Saturday, May 4, 2024
Homeनाशिकनाशिक महानगरपालिका क्षेत्रात डिसेंबरमध्ये होणार कुष्ठरोग-क्षयरोगाचा सर्व्हे

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात डिसेंबरमध्ये होणार कुष्ठरोग-क्षयरोगाचा सर्व्हे

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

नाशिक महापालिका क्षेत्रात अलिकडच्या चार-पाच वर्षात कुष्ठरोगी रुग्ण बोटावर मोजण्या इतके असतांना सन 2019 मध्ये 26 रुग्ण आढळून आले होते. तसेच शहरात 3 हजार 535 क्षयरोगी आढळून आले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर कुष्ठरोग-क्षयरोगाचा सर्व्हे मागे पडल्यामुळे आता नाशिक महापालिका क्षेत्रात येत्या 1 ते 16 डिसेंबर रोजी सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे.

- Advertisement -

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत दरवर्षी राज्यात कुष्ठरोग सर्व्हे केला जातो. तसेच क्षयरोग रुग्ण शोधण्यासाठी देखील सर्व्हे केला जातो. मागील वर्षात करण्यात आलेल्या सर्व्हेत शहरात 26 कुष्ठरोगी रुग्ण आढळून आले होते. तसेच क्षयरोग सर्व्हेत शहरात 3 हजार 535 रुग्ण आढळून आले आहे.

अशाप्रकारे अचानक कुष्ठरोगी व क्षयरोगी रुग्णांत वाढ झाल्याने आरोग्य विभागाकडुन दखल घेण्यात आली आहे. मात्र गेल्या मार्च महिन्यापासुन राज्यात करोना विषाणुमुळे याच आजारावर शासन स्तराव लक्ष देण्यात येऊन इतर आजारांना दुय्यम स्थान देण्यात आले होते.

आता करोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे महापालिका क्षेत्रात कुष्ठरोगी व क्षयरोगाचा सर्व्हे करण्यात येणार असुन हा सर्व्हे 1 ते 16 डिसेंबर 2020 या कालावधीत केला जाणार आहे. या सर्व्हे करीत महापालिका क्षेत्रात 142 पथके तयार करण्यात आली आहे.

या पथकांकडुन शहरातील लोकसंख्येच्या 35 टक्के भागाचा अर्थात सुमारे 7.5 लाख लोकसंख्येचा सर्व्हे केला जाणार आहे. शहरातील गर्दीच्या भागात या आजाराचा प्रादुर्भाव होत असल्याने याच भागात घरोघरी जाऊन सर्व्हे केला जाणार आहे.

यात विशेषत: झोपडपट्टी, दाट वस्तीचा भाग यात भद्रकाली, नवीन नाशिक परिसरात हा सर्व्हे केला जाणार आहे.

महापालिकेकडुन हा सर्व्हे केला जात असतांनाच करोनाचा सर्व्हे केला जाणार आहे. अशाप्रकारे शहरात आता पुढील महिन्यात 1 ते 16 तारखेला कुष्ठरोगी, क्षयरोग व करोना असा तिहेरी सर्व्हेचे काम आरोग्य विभागाकडुन केले जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या