Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्ह्यात तापमान घसरले ; हुडहुडी वाढली

जिल्ह्यात तापमान घसरले ; हुडहुडी वाढली

नाशिक । प्रतिनिधी Nashik

उत्तर भारतात काही राज्यात बर्फवृष्टी सुरू असल्याने याचे परिणाम शेजारील राज्यात जाणवत असुन मागील पंधरवड्यात राज्यात थंडीचे आगमन झाले होते.

- Advertisement -

मात्र मधल्या काळात थंडी गायब होऊन राज्यात बेमोसमी पाऊस पडला होता. आता पुन्हा एकदा राज्यात किमान तापमान घसरले आहे. परिणामी पुन्हा एकदा पारा 13 ते 14 अंशापर्यत खाली आहे. यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा थंडीची हुडहुडी भरली आहे.

देशाच्या उत्तरेत यंदाच्या हंगामात पहिल्या काही दिवसातच विक्रमी बर्फवृष्टी झाली आहे. परिणाम म्हणून या भागातून शितल वारे वाहू लागल्याने याचे परिणाम मध्य भारतापर्यत जाणवत आहे. या बदलामुळे दोन आठवड्यापूर्वी उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात किमान तापमानात मोठी घट होऊन थंडीचे आगमन झाले आहे.

नंतर दिवाळीत ही थंडी गायब होऊन अचानक किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणिय वाढ झाली. परिणामी, राज्यात काही भागात तुरळक बेमोसमी पाऊस पडला होता. अजुनही हेच वातावरण कायम असून किमान तापमानात काही भागात घट झाली आहे. परिणामी विदर्भात सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली असून हेच वातावरण इतर भागात आहे.

जिल्ह्यात गेल्या बुधवारी (दि.25) रोजी किमान तापमान 16.9 अंश असतांना गुरुवारी पारा 3 अंशाने खाली घसरला गेला आहे. या दिवशी नाशिकचे किमान तापमान 14.3 अंश सेल्सीअस इतके नोंदविले गेले. आज पारा 1 अंशाने खाली येत जिल्ह्यातील किमान तापमान 13.4 अंश नोंदविले गेले. जिल्ह्यातील पारा घसरल्यानंतर याचा मोठा परिणाम निफाड तालुक्यात जाणवू लागला असून जिल्ह्यातील किमान तापमानापेक्षा 1 ते 2 अंशाने कमी तापमान हे निफाड तालुक्यात नोंदविले गेले आहे. पुन्हा थंडीचा मोठा फटका द्राक्ष बागाईतदार शेतकर्‍यांना बसण्याची शक्यता आहे.

परिणामी शेतकर्‍यांना वाढत्या थंडीमुळे द्राक्ष बागांची काळजी घ्यावी लागणार आहे. पारा घसरल्याने नागरिकांना रात्री व पहाटेच्या दरम्यान शेकोटी व उबदार कपड्याचा आश्रय घ्यावा लागत आहे. ग्रामीण जिल्ह्यात पहाटे शेतात काम करणारे व कामावर जाणार्‍यांना हुडहुडी भरु लागली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या