Friday, May 17, 2024
Homeजळगावचाळीसगाव येथे एकावर गोळीबार

चाळीसगाव येथे एकावर गोळीबार

चाळीसगाव – Chalisgaon – प्रतिनिधी :

शहरातील घाट रोड परिसरातील हुडको भागात सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास अज्ञात दोन व्यक्तींनी यामाहा कंपनीच्या गाडीवर येऊन अचानक एकावर गोळीबार सुरु केला.

- Advertisement -

यात तीन गोळ्या झाडल्या गेल्या असून एक गोळी हवेत फायर केली, तर दुसरी जमिनीवर फायर केली असून एक गोळी तरुणाचा पायाल चाटुन गेली आहे.

अचानक गोळीबार झाल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. दरम्यान याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

घाट रोड परिसरात शेख जुगर शेख वसीम उभा असताना अचाकन दोन तरुण मोटार सायंकवर आले. आणि त्यांनी शेख जुगर शेख वसीम यांच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरु केला.

काही समजण्याच्या आताच शेख जुगर शेख वसीम याच्या माडीला एक गोळी चाटुन गेली. फायरिंगचा आवाज झाल्याने परिसरात गर्दी जमा झाल्याने अज्ञात हल्लेखोरांनी तेथून पळ काढला.

जखमी शेख जुगर शेख वसीमला तात्काळ शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांना तात्काळ चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड व त्यांच्या पथकाने घटनास्थळावर जाऊन पाहणी केली.

याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला जखमी शेख जुगर शेख वसीम यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात हल्लेखारांविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस करीत आहेत.दरम्यान शहरातील घाटरोड परिसरातच न.पा.कॉम्प्लेक्स जवळील चहाच्या टपरीजवळ दि,१८ रोजी रात्री आरोपी चांद सलीम सैय्यद (२३) व दानिश असलम शेख दोन्ही रा. नागद रोड झोपडपट्टी, यांच्या पैकी सलीम सैय्यद यांच्याकडे ३० हजार रुपये किमतीची गावठी बनावटीचे पिस्टर व दोन हजार रुपये किमतीचे तीन जिवंत काडतुस असा एकूण ३२ हजार ६०० रुपयांचा अग्निशास्त्र मिळुन आला होता.

याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दोघांविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वीच दोन गटात तुफास हाणामारी झाली होती. त्यात तलवार, सुरे देखील निघाल्याची चर्चा आहे.

ह्या घटना ताज्या असताना आता पुन्हा घाटरोड परिसरात तरुणावर गोळीबार झाल्याने घाटरोड परिसर हा गुन्हेगारांचा अड्ड झाला असून या ठिकाणी पोलिसांचा धाक संपलेला आहे. तसेच घाटरोडवरील पोलीस चौकी देखील शो पिस ठरत आहे.

त्यामुळे आता वरिष्ठानीच याकडे लक्ष देवून काळजीपूर्वक परिस्थिती घातल्यासाठी घाटरोड परिसरात खमक्या आधिकारी नेमण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या