Saturday, May 18, 2024
Homeनाशिककांदा साठवणूक क्षमता, निर्यात खुली करावी

कांदा साठवणूक क्षमता, निर्यात खुली करावी

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

केंद्र सरकारने पुढाकार घेऊन कांद्यावरील निर्यातबंदी खुली करावी व कांदा साठवणूक मर्यादेची अट शिथिल करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आधार द्यावा, अशी मागणी खासदार डॉ.भारती पवार यांनी केंद्रीय वाणिज्य व ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य हे प्रमुख कांदा उत्पादक राज्य म्हणून ओळखले जाते.तसेच देशाच्या एकूण कांदा उत्पादनापैकी जवळपास 33 टक्के कांदा हा महाराष्ट्रात उत्पादित होतो. नाशिक जिल्ह्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणात गुणवत्तापूर्ण कांदा उत्पादन घेतले जाते.

त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांद्याला परदेशात मागणी असल्याने त्याला चांगला भाव मिळून तो निर्यात होतो. सध्या कांदा निर्यात बंद असल्याने कांद्याचे भाव घसरले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

त्याकरीता केंद्र सरकारने पुढाकार घेऊन कांद्यावरील निर्यातबंदी खुली करावी व कांदा साठवणूक मर्यादेची अट शिथिल करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आधार द्यावा, अशी मागणी खासदार डॉ. पवार यांनी केंद्रीय वाणिज्य व ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या