Friday, May 3, 2024
Homeनगरग्रामपंचायत निवडणुक : आज नामांकनाचा शेवटचा दिवस, कोपरगाव तहसील कार्यालयात इच्छुकांची गर्दी

ग्रामपंचायत निवडणुक : आज नामांकनाचा शेवटचा दिवस, कोपरगाव तहसील कार्यालयात इच्छुकांची गर्दी

कोपरगाव । तालुका वार्ताहर । Newasa

ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी रंगात आली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आज शेवटचा दिवस आहे.

- Advertisement -

५ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुकांची अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या आवारात हाऊसफुल गर्दी पहावयास मिळाली आहे. निवडणूक लढवण्यासाठी काळे- कोल्हे-परजने-शिवसेना यासह अनेक गटातील इच्छुकांनी निवडणूक लढविण्यासाठी जणू गुढग्याला बाशिंग बांधल्याचे दिसत आहे. परंपरागत विरोधक असलेले काळे- कोल्हे-परजने हे देखील होऊ घातलेल्या २९ ग्रामपंचायती पैकी जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकवण्यासाठी अनेक प्रकारच्या क्लुप्त्या लढवतांना दिसत आहे तर अनेक ठिकाणी जिरवाजीरवीचे राजकारण आत्तापासूनच सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या