Friday, May 3, 2024
HomeUncategorizedPhoto Gallery : नाशिकच्या 'भरतपूरात' पक्ष्यांचा कुंभमेळा

Photo Gallery : नाशिकच्या ‘भरतपूरात’ पक्ष्यांचा कुंभमेळा

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामधील खानगाव थडी येथे गोदावरी आणि कादवा नदीच्या संगमावर बंधारा बांधण्यात आला. याठिकाणी नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य साकारण्यात आले. १००.१२ चौ.कि.मी. क्षेत्रात पसरलेल्या या अभयारण्यास जगप्रसिध्द पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांनी महाराष्ट्र राज्याचे भरतपूर म्हणून गौरवले…

- Advertisement -

नांदूरमध्यमेश्वर येथील पक्ष्यांच्या अधिवासामुळे तसेच दुर्मिळ पक्ष्यांच्या अस्तित्वामुळे हे क्षेत्र महत्त्वपूर्ण पक्षीक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले.

नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य परिसरात उदमांजर, कोल्हे, लांडगे, बिबळे, मुंगूस, विविध प्रजातीचे साप, कासव हे वन्यप्राणी आढळतात. हिवाळ्यात रोहित, चक्रवाक, तलवार बदक, लालसरी, चतुरंग, सुरय, कादंब, झोळीवाला, करकोचे, शराटी, तुतारी, क्रौंच, गल, चिलखे, कुरल, हरीण इत्यादी पाणपक्षी भेट देत असतात.

चमचा बदक, बगळे, चांदवा, कमळपक्षी, पाणकोंबडी, मुग्धबलाक, खंड्या, ससाणे, पाणबुडी हे स्थानिक पक्षी बघायला मिळतात. पक्षी निरीक्षणासाठी डिसेंबर ते फेब्रुवारी हा उत्तम कालावधी असतो. यामुळे सध्या या भागात मोठी गर्दी पक्षी निरीक्षणासाठी होत आहे. अक्षय मुळे या पक्षीप्रेमीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेले काही आकर्षक छायाचित्रे.

- Advertisment -

ताज्या बातम्या