Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रलॉकडाऊनच्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेणार

लॉकडाऊनच्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेणार

मुंबई | Mumbai

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. करोनाचा संसर्ग वाढू नये हा या मागील हेतू होता. लॉकडाऊन काळात सारं काही ठप्प असून नागरिकांवर कडक निर्बंध लादण्यात आले होते.

- Advertisement -

या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान लॉकडाऊन काळात नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात आल्याची मोठी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हंटले आहे की, “कोविड-19 लॉकडाऊन काळात लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आयपीसी सेक्शन 188 अंतर्गत जे गुन्हे दाखल करण्यात आले होते. ते गुन्हे राज्य शासनाच्या माध्यमातून मागे घेण्यात येत आहेत.”

- Advertisment -

ताज्या बातम्या