Sunday, May 5, 2024
Homeनगरघनकचरा कामगार थकीत वेतनप्रश्नी आंदोलन

घनकचरा कामगार थकीत वेतनप्रश्नी आंदोलन

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर नगरपरिषदसमोर घनकचरा,सेवानिवृत्त व सफाई कामगार यांच्या प्रलंबित प्रश्नावर नगरसेविका सौ प्रणिती दीपक चव्हाण व कामगार नेते दीपक चव्हाण यांनी

- Advertisement -

आमरण उपोषण सुरु केले होते. मात्र मुख्याधिकार्‍यांनी कामगारांचे थकीत वेतन 8 दिवसात देवू असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

पालिकेच्या सर्व विभागातील अधिकारी, सेवानिवृत्त कर्मचारी आणि कामगार यांचे नगर परिषदतर्फे पेन्शन विक्री, पदोन्नती फरक, सेवानिवृत्त 6 व्या आणि 7 व्या वेतन आयोगाचा फरक देय रक्कमा थकीत वेतन ई पोटी देय थकीत रक्कम रूपये 6 कोटी 82 लाख रूपये असुन त्याच बरोबर माहे सप्टेंबर ते माहे जानेवारी पर्यंतचा घनकचरा कामगार यांचे थकीत वेतन रूपये 75 लक्ष रूपये असुन याबरोबरच अ‍ॅवार्डच्या कामगारांना गत् दोन दशकाहुन जास्त न्यायालयीन लढा पालिकेविरुध्द चालु असुन कामगारांच्या मुलांवर उपासमारीची वेळ आली आहे या सर्व प्रश्नांना मुख्याधिकारी गणेशजी शिंदे यांनी सकारात्मक भुमिका घेवुन कामगार प्रश्नावर सहानुभूती पुर्वक निर्णय घेत घनकचरा थकीत वेतन 8 दिवसात करण्याचे मान्य केले.

कामगारांच्या मागणी नुसार अ‍ॅवार्डच्याबाबतीत संबंधित वकील यांच्याशी चर्चा करून सोडवण्यात येतीलच तसेच गोंधवणी रोड येथील प्रभाग दोन मधील 63 कामगार सदनिका 2009 मध्ये कामगारांच्या नावे करण्यात आले असुन या सदनिका रमाई आवास योजने अंतर्गत बांधकाम परवानगी, मेडिकल बिल, आणि ऊर्वरित कर्मचारी यांना शासकीय सदनिका देणे बाबत येत्या सर्व साधारण सभेमध्ये विषय पत्रिकेत घेण्यात येतील असे लेखी स्वरुपात मुख्याधिकारी यांनी दिले तसेच शासकीय गणवेष, महाराष्ट्र बँकेमध्ये कामगारांच्या बाबतीत होणारी वेतन खात्यावर जमा करणे बाबतीत होणारी दिरंगाईबाबत लेखी पत्र व्यवस्थापक यांना देण्यात आले आहे.

या उपोषणाला आ. लहु कानडे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, नगरसेवक अंजूमभाई शेख, श्रीनिवास बिहाणी, राजेश अलघ, मुज्जफर शेख, दिलीप नागरे, दीपक बाळासाहेब चव्हाण, ताराचंद रणदिवे, मनोज लबडे, श्यामलींग शिंदे, सचिन गुजर, संजय छल्लारे, कलीमभाई कुरेशी, रीतेश रोटे, नगरसेविका सौ समिना शेख, सौ भारती कांबळे, सौ. जयश्री शेळके आणि इम्रानभाई शेख, मल्लू शिंदे, कामगार नेते नागेश सावंत, शेतकरी संघटनेचे अहमद जहागीरदार, विश्वनाथ बोकफोडे, रियाज पठाण, आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, लहुजी सेनेचे बाळासाहेब बागुल, रज्जाक शेख, हनिफ पठाण, रीतेश एडके, दत्तात्रय कांदे, गोविंद ढाकणे, विनोद वाघमारे, संघटनेचे मान्यवर उपस्थित होते.

उपोषणामध्ये श्रीमती पार्वती दाभाडे, सुमन करोसिया, माया जेधे, ताराबाई झिंगारे, पुष्पलता चव्हाण, माया रील, नर्मदा झिंगारे आणि नगर परिषद पतसंस्था चेअरमन प्रकाश सपकाळ, मुन्ना जेधे, रमेश बिंगले, राजु बिडलान, मनोज झिंगारे, सचिन चंडाले, राजु कंडारे, रवि गोयर, भाऊसाहेब शेळके, संजय बागडे, राजेंद बोरकर, अमर दाभाडे, अमरावती, अजय जनवेजा, किसन गायके, संतोष केदारे, दिपक धनसिग, लाखन दाभाडे, सुनील जाधव, किसन चव्हाण, मनोज चव्हाण, छगन रील, श्रीपाद बिल्दीकर, बाबुराव मगर, नरेश सांगळे, गुलाब पवार, विजय सोळंकी, प्रविण बागडे, प्रदीप बागडे, प्रसाद चव्हाण, उमेश झिंगारे आदी कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या