Friday, May 3, 2024
Homeनगरथकीत विज बिले वसुलीसाठी महावितरणची धडक मोहीम सुरू

थकीत विज बिले वसुलीसाठी महावितरणची धडक मोहीम सुरू

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

राज्य सरकारने थकीत वीजबिल वसुलसाठी महावितरणच्या अधिकार्‍यांना कडक निर्देश दिल्यामुळे महावितरणच्या

- Advertisement -

पुणतांबा उपकेंद्रांतर्गत कृषी पंपधारक, औद्योगिक, व्यापारी व घरगुती वीज ग्राहकांकडून अंदाजे 15 कोटी 57 लाख रुपयाची थकित वीज बिल वसुलीसाठी येथील अधिकारी व कर्मचारी वर्गाने धडक मोहीम सुरु केली आहे.

अधिकार्‍यांना वसुलीसाठी डीपी बंद करण्याचे तसेच वीज कनेक्शन कट करण्याचे आदेश असल्यामुळे त्यांनीही कुणाचाही मुलाहिजा न ठेवता धडकपणे वसुली अभियान सुरू केले आहे. वसुलीसाठी पुणतांबा परिसरात महावितरणमार्फत बैठका घेण्यात आल्या होत्या. मात्र त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. अधिकार्‍यांनी आवाहन करूनही कृषी पंपधारकांकडून अवघे 3 लाख व घरगुती ग्राहकाकडून 10 लाख असे आतापर्यंत एकूण फक्त 13 लाख रुपये वसुली झाल्याचे येथील अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

त्यामुळे नाईलाजास्तव वसुलीसाठी धडक कारवाई सुरू झाली आहे. कृषी पंपधारकांना वीज बिले माफ होण्याची शक्यता धुसर झाली आहे. डीपी बंद झाली तर पाण्यावर आलेली रब्बी पिके वाया जाऊ नयेत यासाठी शेतकरी वर्गाची सुध्दा कृषी संजीवनी योजनेअंतर्गत असलेल्या योजनेचा लाभ घेऊन बिले भरण्याची मानसिकता निर्माण झाली आहे. महावितरणचे कर्मचारी डेरा नाला येथील बखळे वस्ती समोरची डी.पी तीन दिवसांपासून बंद असल्यामुळे पाहणी करण्यासाठी आले होते.

मात्र पाहणी करण्यापूर्वीच त्यांनी सर्वांनी बिले भरली तर डीपी सुरू करतो, असे स्पष्ट केले. मात्र आम्हाला बिलेच मिळाली नाही. त्यामुळे किती रक्कम भरावयाची हेच माहीत नाही, असा प्रतिप्रश्न केल्यावर कर्मचारी वर्गाची बोलती बंद झाली. त्यांनी सर्वांना दोन दिवसांत बिले पोहच करण्याचे स्पष्ट केले व शेतकरी वर्गानेही आम्ही बिले भरणार आहोत, असे सूचित केले.

तसेच आम्हाला दिवसा नियमित किमान 8 तास वीजपुरवठा करावा, अशी मागणी केली. दरम्यान महावितरणमार्फत वसुलीसाठी धडक अभियान सुरू केल्यामुळे त्याला पुणतांबा परिसरात कसा प्रतिसाद मिळतो याकडे अधिकारी कर्मचारी तसेच सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांचे लक्ष लागून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या