Friday, May 3, 2024
Homeनगरकलेक्टरकडून नगरमधील लॉन्सची झाडाझडती

कलेक्टरकडून नगरमधील लॉन्सची झाडाझडती

अहमदनगर (प्रतिनिधी) – सांगूनही वधू-वर बाप कोरोना नियमांचे पालन करत नसल्याने आज (सोमवारी) दस्तुरखुद्द कलेक्टर आणि एसपी कारवाईसाठी नगरच्या मैदानात उतरले. दोघांच्या संयुक्त पथकाने आशिर्वाद, ताज आणि सिटी लॉनमध्ये झाडाझडती घेतली. पन्नासपेक्षा जास्त लोकांची गर्दी दिसून आल्याने कारवाई केली. शहरातील विविध लॉन्स आणि मंगल कार्यालयांची चेकिंग पथकाकडून सुरू आहे.

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कोरोना नियमावली जारी केली आहे. त्यात लग्न सोहळ्यासाठी केवळ 50 वर्‍हाडींनाच परवानगी आहे. मात्र, या नियमांचे पालन होत नसल्याने आज सोमवारी कलेक्टर राजेंद्र भोसले हे एसपी मनोज पाटील यांना सोबत घेऊन तपासणीसाठी रस्त्यावर उतरले. त्यांच्या पथकाने सिटी, ताज आणि आशिर्वाद लॉन्स या ठिकाणी रेड टाकली. लग्नप्रसंगी मास्क न वापरणार्‍यांवरही कारवाई करण्यात आली. मंगल कार्यालयाच्या मालकाविरोधातही कारवाई सुरू होती.

- Advertisement -
  • कॉलेजमध्येही झाडाझडती

  • कॉलेजमध्येही मास्क वापरणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक विद्यार्थी मास्क वापरत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर कलेक्टर-एसपींच्या पथकाने नगर कॉलेजकडे धाव घेत तेथे कोरोना नियमांचे पालन होते की नाही, याची शहानिशा केली. नियम मोडणार्‍या विद्यार्थी, शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या दोघांच्या पथकाने शहरातील विविध भागांत पाहणी करून कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या