Friday, May 17, 2024
Homeनाशिकसासरच्यांनी रचला विवाहितेच्या आत्महत्येचा बनाव

सासरच्यांनी रचला विवाहितेच्या आत्महत्येचा बनाव

ओझे | Oze

सततचा मानसिक त्रास, पैशासाठी छळ यातून माधुरीची हत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

- Advertisement -

याबाबतचे निवेदन कुटुंबियाकडून गृहमंत्री अनिल देशमुख याना देण्यात आले आहे.

दिंडोरी तालुक्यातील ढकांबे येथील विठ्ठल आव्हाड यांची मुलगी माधुरी हिचा विवाह निफाड तालुक्यातील चापडगावं येथील कोंडाजी घुगे यांचा मुलगा प्रशांत घुगे यांच्याशी १७ डिसेंबर २०१३ साली झाला होता.

यानंतर माधुरीला सासरच्या मंडळीकडून सतत मानसिक व शारीरिक त्रास देत होते. यातच तिला दोन मुली झाल्याने सासरच्यांनी आम्हाला मुलगा हवा होता, यावरून अनेकदा मारहाण केली. यानंतर पैशांचा तगादा तिच्याकडे लावण्यात येत होता.

दरम्यान (दि.२०) रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास माधुरीस हॉस्पीटलला ऍडमिट केले. असा फोनही तिच्या घरच्यांना करण्यात आला. त्यानंतर माहेरच्या मंडळी मुंबईला आली. परंतु ते येण्याआधीच ती मृतावस्थेत होती.

यावरून माधुरीच्या घरच्यांनी तिच्या आत्महत्येचा बनाव केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी चौकशी चे निवेदन त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या