Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रआयटीआय विद्यार्थ्यांना शुल्क प्रतिपूर्ती

आयटीआय विद्यार्थ्यांना शुल्क प्रतिपूर्ती

मुंबई l Mumbai (प्रतिनिधी)

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) पीपीपी योजनेंतर्गत उपलब्ध जागांवर प्रवेश घेणाऱ्या तसेच खासगी आयटीआयमधून शिल्प कारागिर प्रशिक्षण योजनेंतर्गत अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना २८ हजार ८०० रुपयांपर्यंत प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ देण्यात येत असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

- Advertisement -

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये प्रथम आणि द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी यासाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

वार्षिक अडीच लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना १०० टक्के तर अडीच लाख ते आठ लाख रुपयांदरम्यान उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना ८० टक्के रकमेच्या प्रशिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती केली जाते.

या विद्यार्थ्यांना भराव्या लागलेल्या प्रशिक्षण शुल्कामधून शासकीय आयटीआयच्या प्रशिक्षण शुल्काइतकी रक्कम वगळून उर्वरित रक्कमेची विद्यार्थ्यांना प्रतिपूर्ती केली जाते. त्यामुळे या योजनेतून विविध अभ्यासक्रमानुसार १९ हजार २०० ते २८ हजार ८०० रुपये इतकी रक्कम विद्यार्थ्यांना परत मिळते, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

या योजनेतून लाभासाठी विद्यार्थ्यांना १० मार्च २०२१ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा www.mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती मलिक यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या