Saturday, May 4, 2024
Homeनगरअर्बन बँक चिल्लर घोटाळा ; चौघांच्या कोठडीत 20 मार्चपर्यंत वाढ

अर्बन बँक चिल्लर घोटाळा ; चौघांच्या कोठडीत 20 मार्चपर्यंत वाढ

अहमदनगर (प्रतिनिधी) –

नगर अर्बन बँकेच्या तीन कोटी रुपयांच्या चिल्लर घोटाळाप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा विभागाच्या पथकाने अटक केलेल्या चार जणांना

- Advertisement -

20 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. या चार जणांच्या कोठडीची मुदत सोमवारी संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. दरम्यान, बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप गांधी यांच्यासह संचालकांना चौकशीसाठी दुसर्‍यांदा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. यानुसार त्यांना हजर होणे गरजेचे होते. संचालकांपैकी फक्त एक जण हजर झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी दिली.

अर्बन बँकेच्या मुख्य शाखेचे तत्कालीन व्यवस्थापक घनश्याम बल्लाळ यांच्यासह राजेंद्र हुंडेकरी, प्रदीप पाटील, स्वप्नील बोरा या चार जणांना आर्थिक गुन्हे शाखा पथकाने अटक केली होती. चिल्लर घोटाळ्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यांमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.

यामध्ये बँकेचे माजी अध्यक्ष तथा माजी खासदार दिलीप गांधी यांच्यासह संचालक मंडळ आणि बँकेतील अधिकार्‍यांचा समावेश आहे. आर्थिक गुन्हे विभागाने या घोटाळ्यासंदर्भातील कागदपत्रे अर्बन बँकेतून मिळवली. साधारणत: पंधरा फाईल हस्तगत केल्या असून, गुन्ह्याच्या दृष्टीने वेगवेगळी माहिती समोर येत आहे. ही माहिती पडताळणी करून पाहिली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या