अहमदनगर | Ahmednagar
राज्यात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
- Advertisement -
त्यामुळे राज्य सरकारने राज्यभरात विकेंड लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लागू केले आहेत.
आज (शनिवार) विकेंड लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी नगर शहरासह तालुक्यात विकेंड लॉकडाऊनला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शनिवार आणि रविवार या दोन दिवसांच्या लॉकडाऊनला पहिल्याच दिवशी जिल्हाभरातही मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
अत्यावश्यक सेवेतील दुकानेही बंद आहेत. तर किराणा माल, भाजीमार्केट, हॉटेल्सनाही टाळे लागले आहे.
वाहतुकीवरही परिणाम दिसून येत आहे.